कीव्ह : पोलंडमध्ये क्षेपणास्त्र पडल्यामुळे जगभरात युद्धाची भीती निर्माण झालेली असताना रशियाने दुसऱ्याच दिवशी युक्रेनवर भीषण ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. यात ऊर्जा, पायाभूत सुविधा, इमारती आणि औद्योगिक क्षेत्र उद्ध्वस्त करण्यात आली असून, चार ठार, तर पाचजण जखमी झाले आहेत.कीव्हच्या प्रशासनाने सांगितले की, हवाई दलाने दोन क्रूझ क्षेपणास्त्रे आणि पाच इराणी बनावटीचे ड्रोन पाडले. युक्रेनमधील रशियन क्षेपणास्त्रांनी काही आठवड्यांनंतर प्रथमच गुरुवारी देशाच्या दक्षिणी ओडेसा प्रदेश आणि निप्रो शहरावर मारा केला.देशभरात हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्यात आले, असे गव्हर्नर मॅक्सिम यांनी सांगितले.