Poland Russia-Ukraine War Updates : पोलंडकडून ऐनवेळी विश्वासघात; युक्रेनला लढाऊ विमाने देण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 09:17 AM2022-03-07T09:17:13+5:302022-03-07T09:17:54+5:30
Poland Russia-Ukraine War Updates : युक्रेनला मिग २९ आणि सुखोई २५ लढाऊ विमानं देण्यास तयार असल्याचं पोलंडनं अमेरिकेला सांगितलं होतं.
Poland Russia-Ukraine War Updates : पाश्चात्य देशांनी रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान (Russia-Ukraine War) आपले सैन्य पाठवण्यास नकार दिला. मात्र अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देश युक्रेनला सातत्याने शस्त्रास्त्रांचा साठा पुरवत आहेत. युक्रेनला रशियाच्या हवाई हल्ल्यांचा सामना करण्यासाठी लढाऊ विमान पुरवू असं पोलंडनं अमेरिकेला सांगितलं होतं. पोलंडला आपली जुनी विमाने देण्यास पोलंड होता पण त्या बदल्यात त्याने अमेरिकेकडून एफ-16 लढाऊ विमानांची मागणी केली होती. मात्र आता पुतीन यांच्या धमकीनंतर पोलंडने आपला प्रस्ताव मागे घेतला आहे.
अमेरिकेनं पोलंडची ही ऑफर मंजुर केल्याचं वृत्त रविवारी समोर आलं होतं. परंतु आता रशियाच्या धमकीनंतर पोलंडनं ऐनवेळी माघार घेतली आहे. "जो देश या युद्धात युक्रेनला लढाऊ विमानं देईल त्यांनाही युद्धात सामील करुन घेतलं जाईल," अशी धमकी पुतीन यांनी दिली होती. तसंच युक्रेनच्या हवाई क्षेत्राला नो फ्लाय झोन घोषित करावं अशी मागणीही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोकडे केली होती. परंतु नाटोनं त्यालाही नकार दिला होता. त्यानंतर झेलेन्स्की यांनी लढण्यासाठी फायटर जेट्सची मागणी केली होती.
आपल्याकडीस मिग २९ आणि सुखोई २५ ही लढाऊ विमानं आपण युक्रेनला देण्यास तयार आहोत. परंतु याची भरपाई म्हणून अमेरिकेला एफ १६ विमानं द्यावी लागतील असं पोलंडनं म्हटलं होतं. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी यांनी यासंदर्भात चर्चा सुरू असून त्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आल्याचं म्हटलं होतं. जर नाटोशी निगडीत देशांनी युक्रेनला सैन्य मदत पोहोचवली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा यापूर्वी रशियानं दिला होता.