रशियाने युक्रेनवर हल्ला केलेल्याला आज नऊ दिवस झाले आहेत. या नऊ दिवसांत युद्ध काय असते, याची प्रचिती नव्या पिढीला य़ेऊ लागली आहे. दुसरे महायुद्ध, त्यानंतरची छोटी मोठी युद्धे पाहिलेल्या पिढीने तेव्हा खूप काही पाहिले. युक्रेनकडे मुठभर सैन्य आहे, परंतू एवढ्या धीराने ते बलाढ्य रशियाला टक्कर देत आहेत की, रशियाची पळता भूई थोडी झाली आहे. रशियाच्या ताब्यात गेलेले बुचा शहरही युक्रेनने परत मिळविले आहे. रशियाची एवढी विमाने पाडलीत की आकडा पाहूनही आश्चर्य वाटेल. याच युक्रेनच्या पोटात आजच्या काळातला भला मोठा खजिना दडला आहे.
युक्रेनच्या जमिनीत असे खनिजाचे विशालकाय साठे आहेत, जे भविष्यात स्वच्छ ऊर्जा बनविण्यासाठी उपयोगी येणार आहेत. युक्रेनच्या पोटात मोबाईल, कारच्या बॅटरीसाठी वापरले जाणारे लीथियम दडलेय. या खनिज तुम्हाला आता खूप माहिती झालेले आहे. परंतू त्याची मागणी आता एवढी वाढली आहे की ते महाग बनत जाणार आहे. युक्रेनच्या पूर्वेकडे पाच लाख टन लीथियम ऑक्साइड असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. जर एवढा साठा असेल तर युक्रेन उद्या जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही. कारण अवघ्या जगाला याचीच तर गरज लागणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लीथियमचा साठा असणाऱ्या देशांच्या पंक्तीत युक्रेन जाऊन बसणार आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की देशाला याच स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रातील खूप मोठा गडी म्हणून दिशा देण्याचे काम करत होते. २०२१ च्या अखेरीस युक्रेनने क्लिन एनर्जी तंत्रज्ञानामध्ये महत्वाची भूमिका निभावू शकेल असे लीथियम रिजर्व, कॉपर, कोबाल्ट आणि निकेलवर मोठा निर्णय घेतला होता. या खनिजांच्या उत्खनन आणि संशोधनासाठी लिलावाची प्रक्रिया सुरु केली होती.
जगभरातील देशांची नजर युक्रेनच्या या साठ्यावर आहे. चीन आणि ऑस्ट्रेलियातील गुंतवणूकदार आधीपासूनच लाईनमध्ये उभे आहेत. चिली, अर्जेंटीना, बोलीविया, ऑस्ट्रेलियामध्येही लिथिअमचे साठे आहेत. मात्र, या बाजारात चीनचा दबदबा आहे. जगातील १० बॅटरींपैकी चार या चीनमध्ये वापरल्या जातात. तसेच ७७ टक्के लिथिअम आयन बॅटरींचे उत्पादनही चीनमध्येच केले जाते. परंतू हे साठे मर्यादित आहेत. यामुळे या देशांना नवीन साठ्यांवर ताबा मिळवायचा आहे. यामुळे अफगाणिस्तान आणि युक्रेनमधील साठे ज्या देशांना मिळतील ते उद्या या क्षेत्रावर राज्य करणार आहेत.