Russia Ukraine War: रशियन एजन्सीनेच जेलेन्स्की यांना तीनदा वाचविले; हत्येचे कट उधळले : रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:59 PM2022-03-04T16:59:01+5:302022-03-04T16:59:50+5:30

Ukraine President Volodymyr Zelenskyy murder attempt: जेलेन्स्की यांची हत्या करण्यासाठी रशियाने भाड्याचे गुंड पाठविले होते. हे लोक रशिया समर्थित वैगनर ग्रुप आणि चेचेन विशेष दलाचे होते.

Russia Ukraine War: 3 Assassination Attempts of Ukraine President Volodymyr Zelenskyy In Last Week, Brtish media reports | Russia Ukraine War: रशियन एजन्सीनेच जेलेन्स्की यांना तीनदा वाचविले; हत्येचे कट उधळले : रिपोर्ट

Russia Ukraine War: रशियन एजन्सीनेच जेलेन्स्की यांना तीनदा वाचविले; हत्येचे कट उधळले : रिपोर्ट

Next

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युद्ध सुरु होताच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मारण्याचा प्लॅन असल्याचा आरोप केला होता. आज युद्धाला आठ दिवस झाले असून या काळात जेलेन्स्की यांना तीनवेळी मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे.

ब्रिटनचे वृत्तपत्र  The Times ने हा खळबळजनक दावा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न रशियन एजन्सीनेच हाणून पाडले आहेत. युक्रेनमध्ये युद्धाच्या विरोधात ही एजन्सी असल्याने तिने रशियाचे हे कट उधळून लावल्याचा दावा करण्य़ात आला आहे. 

जेलेन्स्की यांची हत्या करण्यासाठी रशियाने भाड्याचे गुंड पाठविले होते. हे लोक रशिया समर्थित वैगनर ग्रुप आणि चेचेन विशेष दलाचे होते. मात्र, याची माहिती रशियन फेडरल सिक्योरिटी ब्यूरो (FSB) ला असल्याने त्यांनी ते कट उधळून लावले आहेत. एफएसबीचे कर्मचारी युक्रेनसोबत असून ते युद्धाला विरोध करत आहेत. जेलेन्स्की यांनी देखील त्यांना मारण्यासाठी ४०० खतरनाक लोक पाठविण्यात आल्याचा दावा केला होता. त्यांचे पहिले लक्ष्य आपण व दुसरे लक्ष्य त्यांचे कुटुंब असल्याचे म्हटले होते. 

दुसरीकडे अमेरिकेच्या खासदाराने पुतीन यांची हत्या केल्यास युक्रेन युद्ध थांबेल असे म्हटले आहे. 
 

Web Title: Russia Ukraine War: 3 Assassination Attempts of Ukraine President Volodymyr Zelenskyy In Last Week, Brtish media reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.