मॉस्कोमध्ये जन्म, युक्रेनमध्ये वास्तव्य… आता रशियन गावावर केला कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 08:52 PM2023-03-02T20:52:31+5:302023-03-02T20:53:39+5:30
एका युक्रेनियन गटाने रशियाच्या सीमेवरील बेलगोरोडमध्ये हल्ला केला आहे. तसेच, या सीमेवरील एका गावात काही लोकांना ओलीस ठेवले आहे, असे सांगण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध नव्या वळणावर पोहोचताना दिसून आहे. दरम्यान, एका युक्रेनियन गटाने रशियाच्या सीमेवरील बेलगोरोडमध्ये हल्ला केला आहे. तसेच, या सीमेवरील एका गावात काही लोकांना ओलीस ठेवले आहे, असे सांगण्यात येत आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनियन गटातील 50 समर्थक शस्त्रांसह बेलगोरोडमधील रशियन सीमेवरील एका गावात घुसले. त्यांच्या हातावर पिवळी पट्टी बांधली असून त्यांनी लोकांना ओलीस ठेवले आहे. याचबरोबर, बेलगोरोडमध्ये युक्रेनच्या ऑपरेशनवर बैठक सुरू आहे. क्रेमलिनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक होत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे सल्लागार सतत क्षणोक्षणी अपडेट देत आहेत. या बैठकीमुळे व्लादिमीर पुतीन यांनी आपला कार्यक्रम रद्द केला.
गटाचेचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचा मॉस्को येथे जन्म
दरम्यान, रशियाच्या सीमेवर हल्ला करणाऱ्या युक्रेनियन गटाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचा जन्म मॉस्कोमध्ये झाला होता. यानंतर तो जर्मनीला गेला आणि नंतर युक्रेनमध्ये स्थायिक झाला. 2001 मध्ये तो आपल्या आईसोबत जर्मनीला गेला. तेथे तो कोलोन येथे स्थायिक झाला. तो फुटबॉल फॅन्स ग्रुपचे सदस्य झाला. तिथे त्याची नाझींशी ओळख झाली. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ते स्किनहेड्सच्या टोळीचा सदस्य होता.
परप्रांतीयांच्या हत्या आणि मारहाणीत तो सहभागी होता. 2014 मध्ये त्याने कीव्हला भेट दिली. तेथे त्याने युक्रेनियन नाझींना सक्रियपणे पाठिंबा दिला. 2014 पासून, तो वारंवार युक्रेनला भेट देत आहे. 2017 पासून तो तेथे कायमस्वरूपी राहत होता. तेथे त्याने स्थानिक नाझींच्या अनेक गटांशी (नॅशनल कॉर्प्स, कार्पेथियन सिच, अझोव्ह आणि इतरांसह) संपर्क स्थापित केला आणि त्यांना युरोपियन विचारसरणीच्या लोकांशी सहकार्य विकसित करण्यास मदत केली. 2018 पासून त्याने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला.