Russia Ukraine War: युक्रेनच्या मिलिट्री बेसवर रशियाकडून भयानक हल्ला, ७० युक्रेनियन सैनिक मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 11:15 AM2022-03-01T11:15:35+5:302022-03-01T11:28:12+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील लढाई दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. मंगळवारी रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या मिलिट्री बेसला लक्ष्य करून भीषण हल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक मारले गेले.
किव्ह - रशिया आणि युक्रेनमधील लढाई दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. मंगळवारी रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या मिलिट्री बेसला लक्ष्य करून भीषण हल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक मारले गेले. रशियन सैनिकांनी तोफखान्याच्या मदतीने युक्रेनच्या मिलिट्री तळाली लक्ष्य केले. Okhtyrka हे शहर खारकीव्ह आणि किव्ह या शहरांच्या मध्ये आहे.
स्पुटनिकच्या रिपोर्टनुसार रशियन सैन्य वेगाने किव्हच्या दिशेने आगेकूच करत आहे. युक्रेनची राजधानी किव्हवर कब्जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात केले आहे. रशियाचा ६४ किमी लांब काफिला किव्हच्या दिशेने येत आहे. आतापर्यंत युक्रेनमध्ये पाठवलेली ही सर्वात मोठी कुमक आहे.
अमेरिकन कंपनी मेक्सार टेक्नॉलॉजीसने सोमवारी माहिती दिली की, किव्हच्या उत्तरेला ४० मैल लांब म्हणजेस सुमारे ६४ किमी लांब रशियन सैन्याची कुमक वाटचाल करत आहे. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यापूर्वी या कुमकीची लांबी २७ किमी असल्याचे बोलले जात आहे.