रशिया-यूक्रेन युद्धाला आज जवळपास ३ आठवडे झाले तरी अद्याप या युद्धाचा ठोस निकाल लागला नाही. इतक्या दिवसांपासून रशिया यूक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ला करत आहे. परंतु यूक्रेन सैन्य आणि सर्वसामान्यांचा कडवा प्रतिकार रशियाला विजय मिळवून देण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे बलाढ्य रशिया हतबल झाली आहे. याचवेळी यूक्रेननं रशियाविरोधात ‘फॉस्फरस बॉम्ब’चा(Phosphorous Bomb) वापर केल्याचा दावा केला आहे. हा अत्यंत घातक बॉम्ब असून या कचाट्यात सापडल्यानंतर वाचण्याची शक्यता अजिबात नाही.
न्यूज एजेन्सीनुसार, यूक्रेनच्या मानवाधिकार संस्थेने दावा केलाय की, रशियाने पूर्व लुहान्स्कच्या पोपास्ना शहरात रात्री व्हाइट फॉस्फरस बॉम्बचा वापर केला. त्याबाबत काही फोटोही समोर आले आहेत. युद्धात फॉस्फरस बॉम्बचा वापर केला जाऊ शकतो परंतु रहिवासी क्षेत्रात त्याचा वापर करण्यावर बंदी आहे. फॉस्फरस बॉम्ब हे एक केमिकल असतं त्याचा वापर करण्यास निर्बंध नाहीत. मात्र ज्याठिकाणी नागरीवस्तीचा परिसर आहे तिथे फॉस्फरस बॉम्बचा वापर करू नये असा नियम आहे.
काय आहे फॉस्फरस बॉम्ब?
फॉस्फरस बॉम्ब कुठल्याही रंगाचा नसतो, परंतु अनेकदा तो पिवळसर रंगाचा दिसतो. यात एक मेणबत्तीसारखा पदार्थ असतो त्यातून लसणासारखा गंध येतो तसेच ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर तो पेट घेतो.
फॉस्फरस बॉम्ब किती घातक आहे?
इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉसनुसार, व्हाइट फॉस्फरस हत्यार जळताना फॉस्फरस पसरवतो. या जळत्या फॉस्फरसचं तापमान ८०० डिग्री सेल्सियसहून अधिक असतं. जर कुठल्याही खुल्या जागी फॉस्फरस बॉम्ब फेकला तर तो शेकडो किमीच्या परिसराला नुकसान पोहचवतो.
हा फॉस्फरस बॉम्ब तेव्हापर्यंत पेट घेतो जोपर्यंत यातील फॉस्फरस पदार्थ संपत नाही. किंवा याठिकाणचा ऑक्सिजन संपत नाही. याच्या संपर्कात आल्यावर जळजळ होते आणि ही जळजळ इतकी तीव्र असते की त्याने मृत्यू होतो.
व्हाइट फॉस्फरस हा अंगाला चिटकतो. ज्यामुळे जळजळ आणि जास्त गंभीर परिणाम होतात. इतकचं नाही तर ही त्वचेच्या संपर्कात आल्यास त्याचं केमिकल बनू शकतं. म्हणजे फॉस्फरस पेंटोक्साइड, हे केमिकल त्वचेच पाण्यासारखं बनतं आणि फॉस्फरस एसिड बनतं जे खूप भयंकर असतं.
याच्या उपचारासाठी खूप वेळ जातो. कारण ते शरीरातील आतील पेशींना नुकसान पोहचवतं. ज्यामुळे बरे होण्यास बराच वेळ जातो. त्याशिवाय फॉस्फरस बॉम्ब इतका घातक असतो ज्यामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे. जर मृत्यू झाला नाही तरी मानवी शरीर पूर्णपणे जळत असतं.
फॉस्फरस बॉम्बच्या वापराबद्दल कायदा काय सांगतो?
१९७७ मध्ये स्विझरलँडच्या जेनेवामध्ये परिषद झाली होती. ज्यात सर्वसामान्य नागरिकांना धोका असल्याने फॉस्फरस बॉम्बच्या वापरावर निर्बंध आणले होते. परंतु युद्धात त्याचा वापर केला जाऊ शकतो असंही सांगितलं होतं.
१९९७ मध्ये केमिकल वेपनच्या वापरावर एक कायदा बनवला होता. ज्यात निश्चित झालं होतं की, जर रहिवाशी क्षेत्रात त्याचा वापर केला तर व्हाइट फॉस्फरसला केमिकल वेपन मानलं जाईल. त्या कायद्यावर रशियानेही स्वाक्षरी केली होती.