Vladimir Putin: शक्तीशाली पुतीन यांच्यावर अर्धनग्न महिलेने केला होता हल्ला; तीच संघटना आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 03:36 PM2022-03-14T15:36:58+5:302022-03-14T15:37:10+5:30

Vladimir Putin: एका अर्धनग्न अवस्थेतील तरुणीने जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या व्लादिमीर पुतिन यांना सर्वांसमोर 'हुकूमशहा' म्हटले होते.

Russia Ukraine War | A girl goes topless in front of Vladimir Putin, know full story | Vladimir Putin: शक्तीशाली पुतीन यांच्यावर अर्धनग्न महिलेने केला होता हल्ला; तीच संघटना आता...

Vladimir Putin: शक्तीशाली पुतीन यांच्यावर अर्धनग्न महिलेने केला होता हल्ला; तीच संघटना आता...

googlenewsNext

मॉस्को: युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची जगभर चर्चा आहे. पण, एकेकाळी या जगातील जगातील सर्वात शक्तिशाली नेत्याला सर्वांसमोर एका अर्धनग्न तरुणीने 'हुकूमशहा'(डिक्टेटर) म्हटले होते. विशेष म्हणजे, यावेळी पुतिन यांच्यासोब जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यादेखील होत्या. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जगभरात या फोटोची बरीच चर्चा झाली होती. 

8 एप्रिल 2013 रोजी ही घटना घडली होती. जर्मनीतील हॅनोव्हर शहरात 'हॅनोव्हर मेसे' या औद्योगिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा सुरू होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन विशेष पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्यासोबत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केलही होत्या. विशेष बाब म्हणजे त्यावेळी या प्रदर्शनात 100 हून अधिक रशियन कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

तरुणी 'फेमेन' ग्रुपची सदस्य
पुतिन यांच्यासमोर अर्धनग्न अवस्थेत आलेल्या तरुणीचे नाव अलेक्झांड्रा शेवचेन्को असे आहे. ती युक्रेनमधील 'फेमेन' या संघटनेशी संबंधित होती. ही संघटना महिलांच्या हक्कांसाठी आंदोलन करते. हा ग्रुप अजूनही सक्रिय असून, युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आहेत. 

द गार्डियनशी झालेल्या संभाषणात ती तरुण शेवचेन्कोने या घटनेबद्दल सांगितले - 'मी दुरुनच सूट घातलेल्या पुरुषांचा समूह पाहिला. मी त्यांच्याजवळ गेल्यावर मला पुतिन दिसले. त्यांना पाहताच मला समजले की, ही चांगली संधी आहे. मला ही संधी जाऊ द्यायची नव्हती, म्हणून मी कुंपणावरुन उडी मारली, कपडे काढून पुतिनकडे धावले आणि 'हुकूमशहा' असे ओरडले. तिथे उपस्थित फोटोग्राफर्सनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. बर्‍याच रिपोर्ट्समध्ये या फोटोचे वर्णन 2013 मधील सर्वात खास फोटो म्हणून करण्यात आले होते.

युक्रेन हल्ल्याचा अनेक ठिकाणी निषेध
6 मार्च 2022 रोजी या गटातील 50 मुली आयफेल टॉवरजवळ अर्धनग्न अवस्थेत पोहोचल्या होत्या. त्याआधीही स्पेनमधील माद्रिद शहरात मुलींनी अशाच प्रकारचा निषेध केला होता. 3 मार्च 2022 रोजीही त्यांनी रशियन दूतावासाबाहेर अर्धनग्न उवस्थेत आंदोलन केले होते, त्यावेळी त्यांच्या उघड्या शरीरावर 'पीस फॉर युक्रेन' असे लिहीले होते. 'फेमेन' ही संस्था जगातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. आणि त्याचे सदस्य वेगवेगळ्या स्त्रीवादी मोहिमा करत राहतात. 

Web Title: Russia Ukraine War | A girl goes topless in front of Vladimir Putin, know full story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.