Russia Ukraine War: युक्रेननंतर आता हा देश पुतीन यांच्या निशाण्यावर, रशियन सैन्य करू शकते हल्ला, गुप्तचर यंत्रणांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 09:55 AM2022-05-01T09:55:56+5:302022-05-01T09:57:36+5:30
Russia Ukraine War: रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सुरू झालेले युद्ध जवळपास दोन महिन्यानंतरही सुरू आहे. या युद्धात United Kingdom युक्रेनला मदत करत आहे. यादरम्यान, युनायटेड किंग्डमच्या गुप्तचर यंत्रणेने एक धक्कादायक दावा केला आहे.
लंडन - रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सुरू झालेले युद्ध जवळपास दोन महिन्यानंतरही सुरू आहे. या युद्धात युनायटेड किंग्डम युक्रेनला मदत करत आहे. यादरम्यान, युनायटेड किंग्डमच्या गुप्तचर यंत्रणेने एक धक्कादायक दावा केला आहे. युनायटेड किंग्डमने युक्रेनला पाठिंबा दिल्याने रशिया नाराज झाला असून, त्याचा बदल घेण्यासाठी रशियाचे सैन्य युनायटेड किंग्डमवर हल्ला करू शकते. असा दावा या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे.
द सन मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ब्रिटनच्या काउंटर इंटेलिजन्स आणि संरक्षण एजन्सी एमआय५ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी होम सेक्रेटरी प्रीती पटेल आणि त्यांच्या टीमला रशियन सैन्याच्या हल्ल्याबाबतच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि चीफ ऑफ स्टाफ स्टीव्ह बार्कले यांनाही त्यासंदर्भातील सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी दावा केला की, रशियाचे सैन्य युनायटेड किंग्डमचा बदला घेण्यासाठी हल्ला करू शकते. युनायटेड किंग्डमच्या गुप्तचर एजन्सी अलर्टवर आहेत. युनायटेड किंग्डमला अपमानित करण्यासाठी हा हल्ला केला जाऊ शकतो.
रशिया आणि युनायटेड किंग्डम यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये युनायटेड किंग्डम युक्रेनला साथ देत आहे. युनायटेड किंग्डमने युक्रेनच्या मदतीसाठी हत्यारे पाठवली आहेत. त्यामुळे रशिया नाराज आहे. हल्लीच युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युद्धात युक्रेनचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई रशियाकडून केली गेली पाहिजे, असे विधान केले होते. युक्रेननेही युनायटेड किंग्डमकडून आलेल्या मदतीचे कौतुक केले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी पुतीन यांचं सैन्य युनायटेड किंग्डमवर हल्ला करू शकते, असा दावा केला आहे.