रशिया आणि युक्रेन यांच्यात जवळपास आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. मात्र, अद्यापही या युद्धावर कसल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. रशियाने क्षेपणास्त्र हल्ले करत युक्रेन पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. पण तरीही युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की रशियसमोर ताठ मानेने उभे आहेत. रशिया इराणी ड्रोनसह विधवीध प्रकारची शस्त्रे वापरत आहे. यातच, अमेरिकेसारखे पाश्चात्य देश समोरून रशियाविरोधात वल्गना करत असले तरी पडद्याआडून मात्र, त्यांना मदत करत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. खरे तर, रशियाद्वारे वापरल्या जाणार्या इराणी ड्रोनमध्ये पाश्चात्य कंपोनंट्सचाही समावेश आहे. यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा बळीही गेला.
ब्रिटनमधील एका एक्सपर्टने म्हटले आहे, की जटिल आणि अभेद्य पुरवठा नेटवर्कच्या माध्यमाने तेहरानला उपकरणे विकणाऱ्या खाजगी कंपन्यांना रोखणे सध्या अत्यंत कठीण आहे. यूएसचे समर्थन असलेल्या रेडिओ फ्री यूरोपच्या तपास विभागाने केलेल्या तपासात सल्ला देण्यात आला आहे, की इराणने मोठ्या प्रणावर उत्पादन केलेल्या मोहजर-6 लढाऊ ड्रोनमध्ये अमेरिका आणि युरोपियन युनियन या दोघांचेही काही कंपोनन्ट्स आहेत.
याशिवाय, या घातक शस्त्रांमध्ये चीनच्याही काही गोष्टींचा समावेश आहे. हाँगकाँगमध्ये तयार करण्यात आलेला एक रियल-टाइम मिनी कॅमेराही आहे. यूक्रेनच्या इंटेलिजन्सनुसार, मोहजर - 6 मध्ये उत्तर अमेरिका, युरोपीयन युनियन, जपान आणि तैवानमधील 30 हून अधिक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या कंपोनंट्सचा समावेश आहे. आपल्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी, युक्रेनियन सैनिकांनी काळ्या समुद्रावरील मायकोलायिव्ह भागातील ओचाकिव या किनारी शहराजवळ पाडलेल्या मोजार -6 ड्रोनचे काही भागही पत्रकारांनी पाहिले आहेत.