Russia Ukraine War: बायडन पुतिन यांना धक्का देण्याच्या तयारीत! युक्रेनला होणार फायदा; अमेरिका-रशिया टेंशन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 09:32 AM2022-03-13T09:32:33+5:302022-03-13T09:33:46+5:30

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन युद्धाचा १८ वा दिवस सुरू असून, काही झाले तरी युद्ध मागे घेण्यास रशिया तयार नाही.

russia ukraine war america president joe biden provide additional aid ukraine usd 200 million | Russia Ukraine War: बायडन पुतिन यांना धक्का देण्याच्या तयारीत! युक्रेनला होणार फायदा; अमेरिका-रशिया टेंशन वाढणार?

Russia Ukraine War: बायडन पुतिन यांना धक्का देण्याच्या तयारीत! युक्रेनला होणार फायदा; अमेरिका-रशिया टेंशन वाढणार?

googlenewsNext

वॉशिंग्टन: रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. युक्रेनच्या विविध भागांवर केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशात आणण्यात आले आहे. मात्र, अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाही. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी युक्रेनला आणखी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला असून, हा व्लादिमीर पुतीन यांना मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे अमेरिका-रशिया संबंध तणावग्रस्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. 

अमेरिकेने युक्रेनला सुमारे १५ अब्ज ३५ कोटी रुपयांचे अतिरिक्त सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालय यासाठी अधिकृत मंजुरीसाठी अंमित प्रक्रिया पूर्ण करत आहे. अतिरिक्त मदतीशिवाय, शस्त्रास्त्रे, सैन्य सेवा, शिक्षण आणि प्रशिक्षणही युक्रेनला देण्यात येणार आहे. यापूर्वीही अमेरिकेने कोट्यवधी डॉलरची मदत जाहीर केली होती. दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धाचा १८ वा दिवस सुरू आहे. काही झाले तरी युद्ध मागे घेण्यास रशिया तयार नाही. 

गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर बोलताना पुन्हा एकदा रशियाला इशारा दिला आहे. रशियाने रासायनिक शस्त्रांचा वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. अमेरिका युक्रेनमध्ये जाऊन रशियाशी लढणार नाही. मात्र, नाटो आणि क्रेमलिन यांच्यात थेट लढाई झाली, तर तिसरे महायुद्ध गतिमान होईल, असा दावा करत रशिया कधीही युक्रेन जिंकू शकत नाही, असे बायडन यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, युरोपातील सहकारी देशांसोबत आम्ही ठामपणे उभे राहू. नाटो देशाच्या एक एक इंच जमिनीच्या रक्षणासाठी आम्ही पुढाकार घेऊ. तसेच अन्य देशांना त्यासाठी प्रेरित करू. नाटो देशांची रशियाशी लढाई झाल्यास तिसरे महायुद्ध अटळ होईल. मात्र, तिसरे महायुद्ध होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बायडन यांनी स्पष्ट केले. उत्तर अटलांटिक संधी संघटन म्हणजेच नाटो हा ३० उत्तर अमेरिका आणि युरोपीय देशांचा एक समूह आहे. याचा उद्देश राजकीय आणि सैन्य साधनांच्या माध्यमातून आपल्या सदस्य देशांचे स्वातंत्र्य आणि संरक्षणाची हमी देणे असा असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: russia ukraine war america president joe biden provide additional aid ukraine usd 200 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.