युक्रेन रशियापुढे शरणागती पत्करणार? युद्धामध्ये अमेरिकेच्या निर्णयाने आणला नवा ट्विस्ट, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 03:37 PM2023-12-08T15:37:42+5:302023-12-08T15:37:59+5:30

एक अशी बाब घडली आहे, ज्यामुळे रशिया विरूद्ध युक्रेनची मोहिम कमकुवत पडण्याची शक्यता आहे

Russia Ukraine War America stopped funding time to surrender for Zelensky army reason | युक्रेन रशियापुढे शरणागती पत्करणार? युद्धामध्ये अमेरिकेच्या निर्णयाने आणला नवा ट्विस्ट, कारण...

युक्रेन रशियापुढे शरणागती पत्करणार? युद्धामध्ये अमेरिकेच्या निर्णयाने आणला नवा ट्विस्ट, कारण...

Russia Ukraine War, America : रशियाविरुद्धच्यायुद्धात युक्रेन आता कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. कारण अमेरिकेने आपला निधी बंद केला असल्याची माहिती आहे. सिनेटमधील रिपब्लिकन सिनेटर्सनी युक्रेनला अब्जावधी डॉलर्सचा निधी रोखला. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आधीच इशारा दिला आहे की युक्रेनला निधी देणे थांबवल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, परंतु युक्रेनला निधी मिळण्याची आशा आहे. अमेरिकेने निधी देणे बंद केल्याने युक्रेनसमोर रशियाविरुद्धची आक्रमकता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. युक्रेन आपल्या लष्करी गरजांसाठी अमेरिकेवर अवलंबून होता. त्यामुळे रोखलेली मदत युक्रेनला शस्त्रास्त्रांचा विस्तार करण्यापासून रोखू शकतो, लष्करी प्रशिक्षण आणि रसद प्रभावित होऊ शकते, ज्यामुळे रशियाविरूद्धचे युद्ध थेट कमकुवत होईल.

यूएस सिनेटमध्ये नाकारण्यात आलेल्या बिलामध्ये समाविष्ट $110 बिलियनपैकी $61 अब्ज एकट्या युक्रेनला द्यायचे होते, जे युद्धादरम्यान रशियाविरोधात युक्रेनला बळ देऊ शकतात. अमेरिकेतील युक्रेनच्या राजदूत ओक्साना मार्कारोव्हा यांना आशा आहे की अमेरिकन काँग्रेस पुन्हा एकदा या मुद्द्यावर मतदान करेल. अमेरिकन सीमेच्या सुरक्षेशी संबंधित बाबींचा उल्लेख न केल्याने रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर संतप्त झाल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे आणि त्यामुळे डेमोक्रॅट सरकारला निधीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

रशिया फायदा घेऊ शकतो, आत्मसमर्पण करण्यास युक्रेनला भाग पाडू शकतो

अमेरिकेने निधी थांबवल्याचा सर्वात वाईट परिणाम युक्रेनच्या लष्करावर होणार आहे, ज्यांना येत्या काही दिवसांत वातावरणातील बदलाचा, थंडीचा सामना करावा लागणार आहे. थंडीच्या काळात लष्कराला तंदुरूस्त राहणे कठीण होणार आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि लष्कराचे वरिष्ठ कमांडर यांच्यात सारं काही आलबेल नाही. राजकीय आणि आर्थिक उलथापालथ झाल्यास रशिया त्याचा फायदा घेऊन युक्रेनच्या लष्कराला शरणागती पत्करण्यास भाग पाडू शकतो, असेही दावे केले जात आहेत.

Web Title: Russia Ukraine War America stopped funding time to surrender for Zelensky army reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.