Russia-Ukraine War: रशियाला थोपेना! आता युक्रेनवर दुसरा देश हल्ला करणार; उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 12:00 PM2022-03-12T12:00:56+5:302022-03-12T12:01:12+5:30
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 17 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. निकोलायव्हमध्ये गोळीबार सुरू असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. रशियन सैन्य आता ओडेसामध्ये हल्ले तीव्र करत आहे. तसेच रशिया ओडेसामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे.
युक्रेनमध्ये अर्धामहिना संपत आला तरी देखील रशियाला काही एक दोन शहरे वगळता ताब्यात घेता आलेले नाही. कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया जंग जंग पछाडत आहे. अशातच रशियाचा मित्र देश आणि शेजारी बेलारूस आज रात्री युक्रेनवर हल्ला चढविणार असल्याचा दावा युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेने केला आहे.
युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने हा दावा केला आहे. बेलारुसचे सैन्य शनिवारी रात्री ९ वाजता युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात करेल असे म्हटले आहे. युक्रेनमधून बेलारूसमध्ये हवाई हल्ले करण्यात आले होते. ते रशियाने बेलारुसला युक्रेनविरोधात पावले उचलण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप युक्रेनने केला होता. बेलारुसला युद्धात उतरण्यासाठी कारण तयार केले जात असल्याचा दावा युक्रेनने केला होता. या आधी रशियाने बेलारुसच्या भूमीचा वापर युक्रेनवर हल्ले करण्यासाठी केला आहे.
⚡️Belarus may launch attack on Ukraine today, on March 11.
— The Kyiv Independent (@KyivIndependent) March 11, 2022
According to Ukraine’s Center for Strategic Communications and Information Security, Belarusian forces may launch an assault against Ukraine at 9 p.m.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मेलिटोपोलच्या महापौरांचे अपहरण हा लोकशाहीविरुद्धचा युद्ध गुन्हा असल्याचे म्हटले आहे. रशियन सैन्याची ही कृती आयएसआयएस सारखी मानली जाईल. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 17 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. निकोलायव्हमध्ये गोळीबार सुरू असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. रशियन सैन्य आता ओडेसामध्ये हल्ले तीव्र करत आहे. तसेच रशिया ओडेसामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे.
युक्रेनवर रशियाचे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. युक्रेनच्या लुत्स्कच्या महापौरांच्या वतीने रशियन सैन्याने गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये ४ जवान शहीद झाले. तर 6 जण जखमी झाले आहेत. रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीववर जोरदार बॉम्बफेक केली आहे. रशियाने राजधानी कीवमध्ये अनेक स्फोट घडवून आणल्याचा दावा युक्रेनने केला आहे.