कीव – रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाला ८ दिवस उलटले तरीही यूक्रेनचा पराभव करणं बलाढ्य रशियाला शक्य झालं नाही. रशिया-यूक्रेन युद्ध झाल्यास एकतर्फी निकाल लागेल असं मानलं जात होतं. परंतु यूक्रेननं अनेक ठिकाणी रशियाच्या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे रशियाला यूक्रेनविरुद्धच्या युद्धात प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे. आतापर्यंत रशियाला यूक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यात यश आलं नाही. यूक्रेनची एअर डिफेन्स फोर्सही युद्धात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
रशिया – यूक्रेन युद्धात सुरुवातीला कमकुवत वाटणारा यूक्रेन कशारितीने या संकटाचा सामना करतोय याबाबत अनेकांना प्रश्न आहे. असे कुठले शस्त्र आहेत ज्यामुळे यूक्रेनसमोर रशियाची डोकेदुखी वाढली आहे. मागील ८ दिवसांत यूक्रेननं रशियाच्याविरोधात Stingers आणि Javelins या शस्त्राचा प्रमुख वापर केला. या दोन मिसाइलच्या जीवावर रशियाच्या लढाऊ विमानांना यूक्रेन मारलं. त्यात अनेक सैनिक मृत्युमुखी पडले. यूक्रेनकडे असणाऱ्या या मिसाइलबाबत जाणून घेऊया.
स्टिंगर मिसाइल्स
रशियाच्या विरोधात यावेळी यूक्रेन सर्वात जास्त स्टिंगर मिसाइल्सचा वापर करत आहे. ही तीच मिसाइल आहे जी अनेक वर्षापूर्वी अफगाणिस्तानच्या धरतीवर वापरण्यात आली होती. तेव्हाही सोव्हिएत संघाच्या सैन्याला हार पत्करावा लागली होती. याचं कारण होतं ती स्टिंगर मिसाइल्स, या मिसाइलची खासियत सांगायचं झालं तर कमी उंचीवरील कुठल्या लढाऊ विमानाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. एकाच हल्ल्यात विमान पाडलं जाऊ शकतं.
या मिसाइल्सचा वापर करण्यासाठी जादा सैन्याची आवश्यकता नसते. कुणीही खांद्यावर ठेऊन ती उडवू शकतो. ही स्टिंगर मिसाइल अमेरिकेचा अविष्कार आहे. अमेरिकेन सैन्यामध्ये स्टिंगर मिसाइल्सचा सर्वाधिक वापर होतो. परंतु रशिया-यूक्रेन लढाईत हीच स्टिंगर मिसाइल यूक्रेन सैन्यासाठी मोठी ताकद बनली आहे. इतिहास पाहिला तर या मिसाइलनं नेहमी रशियन सैन्याला संकटात टाकलं आहे. अफगाणिस्तानच्या युद्धात रशियाला याच मिसाइलमुळे हार मानावी लागली आणि तो देश सोडून यावा लागला. आता पुन्हा स्टिंगर मिसाइल्सचा वापर होत आहे. टार्गेटही रशियाच आहे. यूक्रेनला अन्य देशांकडून या मिसाइल्सचा पुरवठा केला जात आहे.
एँटीटँक जेवलिन मिसाइल
रशिया सैन्याविरोधात यूक्रेनकडे दुसरं हत्यार म्हणजे रशियासाठी काळ ठरत असलेले एँटीटँक जेवलिन मिसाइल. हे अमेरिकेचं हत्यार आहे. परंतु मागील काही वर्षापासून यूक्रेनमध्ये या मिसाइल्स मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. ५ किमी परिघात हल्ला करणारी मिसाइल अर्बन वॉरफेअर मानली जाते. टँक उडवणे, कमी उंचीवरील हेलिकॉप्टरला निशाणा बनवणं त्यात ही मिसाइल प्रभावशाली आहे. एकाच हल्ल्यात शत्रूचं लढाऊ विमान आणि टँक उडवण्याची क्षमता यात आहे.
या मिसाइलमध्ये दोन मोड असतात. पहिलं डायरेक्ट आणि दुसरा टॉप अटॅक, टॉप अटॅक मोडचा वापर टँक, हत्यारबंद वाहनाला निशाणा बनवण्यासाठी केले जाते. तर डायरेक्ट मोडमध्ये मिसाइल इमारत, कमी उंचीवरील वस्तूंना टार्गेट करू शकते. या मिसाइल्सचा वापर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, सौदी अरब, इंडोनेशिया, यूएई, तैवान, ब्रिटनसारखे २० देश करत आहेत. ही सर्वात शक्तिशाली एँटीटँक मिसाइलपैकी एक आहे.