Russia-Ukraine War: ज्याची भीती होती, तेच घडले! चेचेनी योद्धे कीव्हच्या वेशीवर पोहोचले; प्रचंड नरसंहाराची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:33 AM2022-03-14T11:33:19+5:302022-03-14T11:34:07+5:30

Russia-Ukraine War: रशियाने नरसंहार करण्यासाठी आणि युक्रेनच्या सैन्याला संपविण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष  व्लादिमीर पुतीन यांनी चेचेनी योद्ध्यांना युक्रेनमध्ये लढण्यासाठी पाठविले आहे. हे चेचेनी युक्रेनच्या सैन्यावर हल्ले करत आहेत.

Russia-Ukraine War: Chechen warriors reach the gates of Kiev; Fear of massive genocide | Russia-Ukraine War: ज्याची भीती होती, तेच घडले! चेचेनी योद्धे कीव्हच्या वेशीवर पोहोचले; प्रचंड नरसंहाराची भीती

Russia-Ukraine War: ज्याची भीती होती, तेच घडले! चेचेनी योद्धे कीव्हच्या वेशीवर पोहोचले; प्रचंड नरसंहाराची भीती

Next

रशियाने युक्रेनवर हल्ले करायला सुरुवात केल्यास आज १८ दिवस पूर्ण झाले. युक्रेनची राजधानी कीव अद्याप रशियाच्या ताब्यात आलेली नाही. दोन्ही देशांदरम्यान चर्चेची चौथी फेरी सुरु होणार आहे. १९व्या दिवशी रशियाने युक्रेनची १९ शहरे घेरली आहेत. या शहरांमध्ये हवाई हल्ल्याचा सायरन वाजविण्यात आला आहे. खारकीववर देखील रशियन सैन्याचे मिसाईल हल्ले सुरु आहेत. असे असताना चेचेन योद्धे कीवच्या वेशीवर पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

रशियाने नरसंहार करण्यासाठी आणि युक्रेनच्या सैन्याला संपविण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष  व्लादिमीर पुतीन यांनी चेचेनी योद्ध्यांना युक्रेनमध्ये लढण्यासाठी पाठविले आहे. हे चेचेनी युक्रेनच्या सैन्यावर हल्ले करत आहेत. त्याचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर हल्ले करत आहेत. हे चेचेनी आता कीवच्या सीमेवर पोहोचले असून राजधानीत कहर करण्याची शक्यता आहे. 

याआधी रविवारी रशियाने युक्रेनमधील लष्करी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला होता. यात 180 परदेशी मारेकरी मारल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियाने लष्करी प्रशिक्षण केंद्रावर ३० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झाला असून 134 जण जखमी झाले आहेत. त्यांनी पीडितांच्या राष्ट्रीयत्वाची ओळख उघड केलेली नाही.

रशियाची ही वृत्ती पाहता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली आहे. रशियावर आणखी कडक निर्बंध लादण्याबाबत या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
 

Web Title: Russia-Ukraine War: Chechen warriors reach the gates of Kiev; Fear of massive genocide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.