Russia Ukraine War: युद्धासोबत फ्लर्ट, रशियन सैनिक युक्रेनियन महिलांना पाठवताहेत असे मेसेज 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 11:17 AM2022-02-24T11:17:17+5:302022-02-24T11:19:19+5:30

Russia Ukraine News: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटले असतानाच रशियन सैनिक युक्रेनियन महिलांसोबत फ्लर्ट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैनिक टिंडरवर फ्लर्टी मेसेज पाठवत असल्याचा दावा एका युक्रेनियन महिलेने केला आहे.

Russia-Ukraine War: Flirt with war, message Russian soldiers send to Ukrainian women | Russia Ukraine War: युद्धासोबत फ्लर्ट, रशियन सैनिक युक्रेनियन महिलांना पाठवताहेत असे मेसेज 

Russia Ukraine War: युद्धासोबत फ्लर्ट, रशियन सैनिक युक्रेनियन महिलांना पाठवताहेत असे मेसेज 

googlenewsNext

मॉस्को - गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणानंतर आज अखेर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटले आहे. युक्रेनची राजधानी किव्ह आणि खारकिव्ह या शहरांमध्ये बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. दरम्यान, युद्धाला तोंड फुटले असतानाच रशियन सैनिक युक्रेनियन महिलांसोबत फ्लर्ट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैनिक टिंडरवर फ्लर्टी मेसेज पाठवत असल्याचा दावा एका युक्रेनियन महिलेने केला आहे.

युक्रेनमधील एका महिलेने याबाबचा स्क्रिनशॉट शेअर करत सांगितले की, रशियन सैनिक त्यांना सोशल मीडियावर फ्लर्ट करण्याच्या उद्देशाने मेसेज पाठवत आहेत. अनेक सैनिकांनी कथितपणे आपल्या पदांची माहितीसुर्धा फोटोंसोबर महिलांना पाठवली आहे. द सनच्या रिपोर्टनुसार अनेक रशियन सैनिकांकडून युक्रेनियन महिलांना आकर्षित करण्यासाठी आपल्या प्रोफाईल डेटिंग अॅपवर अकाऊंट तयार करण्यात आले आहे. Dasha Synelnikova नावाच्या एका महिलेने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून टिंडरवर अनेक रशियन सैनिक तिला मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत. 

३३ वर्षीय Dasha Synelnikova ने सांगितले क, मी युक्रेनमधील किव्ह येथे राहते.मात्र एका मित्राने मला सांगितले की, टिंडरवर अनेक रशियन सैनिक आले आहेत. त्यामुळे मी माझं लोकेशन खारकिव्ह असं बदललं. मात्र तिथेही मला सैनिकांकडून मेसेज येऊ लागले. तिने पुढे सांगितले की, एका फोटोमध्ये एक रशियन सैनिक बनियानमध्ये दिसत होता. तर एका फोटोमध्ये एक सैनिक पिस्तुलासह बेडवर झोपलेला दिसत होता. मात्र त्या दोघांमध्ये कुणीही मला आकर्षक वाटला नाही. मी टिंडरवर त्यांची रिक्वेस्ट रिजेक्ट केली.

Dasha Synelnikova ने यावेळी आंद्रेई नावाच्या एका रशियन सैनिकासोबच झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला. तिने आंद्रेईला विचारले की तू कुठे आहेस. तू खारकिव्हमध्ये आहेस का, त्यावर त्याने सांगितलं की, मी खारकिव्हमध्ये नाही. मात्र त्याच्या जवळ आहे केवळ ८० किमी दूर. 

Web Title: Russia-Ukraine War: Flirt with war, message Russian soldiers send to Ukrainian women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.