Russia Ukraine War: हातात फुले, छातीवर लिहिले 'युद्ध थांबवा', पुतीन यांच्याविरोधात टॉपलेस झाल्या महिला?   

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:03 PM2022-03-04T18:03:37+5:302022-03-04T18:04:20+5:30

Russia Ukraine War: विविध देशातील सामाजिक संघटनांकडूनही रशिया आणि पुतीन यांना विरोध होत आहे. यादरम्यान, एका चर्चिच फेमिनिस्ट समुहाने युद्धाविरोधात  टॉपलेस होऊन आंदोलन केले आहे.

Russia Ukraine War: Flowers in hand, 'Stop the war' written on chest, topless women against Putin? | Russia Ukraine War: हातात फुले, छातीवर लिहिले 'युद्ध थांबवा', पुतीन यांच्याविरोधात टॉपलेस झाल्या महिला?   

Russia Ukraine War: हातात फुले, छातीवर लिहिले 'युद्ध थांबवा', पुतीन यांच्याविरोधात टॉपलेस झाल्या महिला?   

Next

माद्रिद - रशियाने युक्रेनमध्ये केलेले आक्रमण दिवसेंदिवस भीषण होत चालले आहे. एकीकडे रशियावर राजकीय आणि आर्थिक दबाव वाढवण्यासाठी अमेरिका आणि युरोपमधील देश प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे विविध देशातील सामाजिक संघटनांकडूनही रशिया आणि पुतीन यांना विरोध होत आहे. यादरम्यान, एका चर्चिच फेमिनिस्ट समुहाने युद्धाविरोधात  टॉपलेस होऊन आंदोलन केले आहे.

फिमेन नावाच्या फेमिनिस्ट समुहाशी संबंधित महिलांनी स्पेनच्या माद्रिदमध्ये  तीन मार्च २०२२ रोजी रशियन दुतावासाबाहेर आंदोलन केले. महिलांनी आपल्या उघड्या छातीवर पुतीन युद्ध बंद करा, युक्रेनसाठी शांती,  अशी वाक्ये लिहिली होती. शरीरावर बॉडी पेंटिंगसह आंदोलकांनी हातांमध्ये फुलांचे गुच्छसुद्धा घेतलेले दिसत होते. त्यांनी केसांमध्ये फुले माळली आहेत.

फेमिनिस्ट समूग फिमेन ची स्थापना २००८ मध्ये युक्रेनमध्येच झाली होती. मात्र हा समूह फ्रान्समधून काम करत आहे. रशियाकडून युक्रेनला धमक्या देण्यात येत असल्यापासून हा समुह रशिया आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका करत आहे.  माझं शरीर, माझं हत्यार हे फिमेन संस्थेचं घोषवाक्य आहे. फिमेन सेक्ट्रिमिझम, एथिझम आणि फेमिनिझम बोलत असते. आमची देवता स्त्री आहे. आमचं लक्ष्य आंदोलन आहे आणि आमचं हत्यार उघडी छाती आहे.

महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणे हे आपलं लक्ष्य असल्याचा दावा या संघटनेकडून करण्यात येत असतो. या समूहाचे आक्रमक कॅम्पेन आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्याचं काम करत असतो.

२४ फेब्रुवारीपासून रशियाकडून युक्रेनवर आक्रमक हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांचे सैनिक मारले जात आहेत. तसेच युक्रेनमध्ये सामान्य नागरिकांचाही मृत्यू होत आहे. या कारवाईमुळे रशियावर जगभरातून टीका होत आहे. तसेच युद्धाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेकडून रशियावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. 

Web Title: Russia Ukraine War: Flowers in hand, 'Stop the war' written on chest, topless women against Putin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.