शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

BIG BREAKING: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला, २५ जणांची तुकडी अटकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 8:14 PM

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे रशियाच्या स्पेशल सर्व्हिसच्या नेतृत्त्वाखाली केल्या गेलेल्या आणखी एका हल्ल्यातून बचावले आहेत. कीव्ह पोस्ट द्वारे याची माहिती देण्यात आली आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे रशियाच्या स्पेशल सर्व्हिसच्या नेतृत्त्वाखाली केल्या गेलेल्या आणखी एका हल्ल्यातून बचावले आहेत. कीव्ह पोस्ट द्वारे याची माहिती देण्यात आली आहे. स्लोवाकिया-हंगेरी सीमेजवळ युक्रेनी अधिकाऱ्यांनी रशियाच्या स्पेशल सर्व्हिस टीमच्या २५ जणांच्या तुकडीला अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या तुकडीचं एकमेव लक्ष्य जेलेन्स्की यांना ठार करणं होतं. दोन्ही देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून जेलेन्स्की यांच्यावर अनेकदा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा युक्रेननं केला आहे. पण जेलेन्स्की प्रत्येकवेळी बचावले आहेत. 

कीव्ह पोस्टद्वारे केल्या गेलेल्या एका ट्विटमधून याची माहिती देण्यात आली आहे. "वोलोदिमीर जेलेन्स्की यांना जीवे मारण्याचा आणखी एक प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. यावेळी स्लोवाकिया-हंगेरी सीमेजवळ रशियाच्या स्पेशल सर्व्हिसच्या नेतृत्वाखालील २५ जणांच्या एका सैन्य समूहाला पकडण्यात आलं आहे. जेलेन्स्की यांची हत्या करण्याचं लक्ष्य या टीमचं होतं", असं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. रशियाकडून २४ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाल्यानंतर खुद्द जेलेन्स्की यांनीही मी आणि माझं कुटुंब रशियाचं नंबर वन टार्गेट असल्याचं म्हटलं होतं. जेलेन्स्की यांनी रशियाच्या याच तुकडीबाबत सावधानतेचा इशारा देखील याआधी दिला होता. माझी हत्या करण्याचं टार्गेट घेऊन आलेल्या काही रशियन तुकड्या कीव्हमध्ये शिरल्या आहेत आणि ते माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या शोधात आहेत, असं जेलेन्स्की यांनी म्हटलं होतं. 

फेब्रुवारीतच झाला होता हत्येचा प्रयत्नयाआधी ४ मार्च रोजी टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात जेलेन्स्की यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. एक-दोन नव्हे, तर तीन वेळा तसा प्रयत्न केला गेला. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की जेलेन्स्की यांच्या हत्येसाठी वेगवेगळ्या टीम रशियाकडून पाठविण्यात आल्या होत्या. यात रशियाच्या वॅगनर ग्रूप आणि चेचेन स्पेशल फोर्सच्या सैनिकांचा समावेश होता. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्या तुर्कीमध्ये चर्चा होणार असल्याच्या वृत्तावेळीच जेलेन्स्की यांच्या हत्येचा कट उधळण्यात आल्याची बातमी समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही देशांमधील चर्चेत युद्धशांतीबाबत सकारात्मक चर्चा होईल अशी आशा आहे. 

युक्रेनला हवी शांतता- जेलेन्स्कीयुक्रेनला रशियासोबत शांतता प्रस्थापित करायची आहे आणि  यासाठी आम्ही आग्रही आहोत, असं जेलेन्स्की यांनी याआधीच म्हटलं आहे. त्यामुळे जेलेन्स्की तटस्थ भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. तसंच रशियाकडूनही सुरक्षेची हमी दिली जाईल असं म्हटलं जात आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वाच्या समोरासमोरील चर्चेतूनच युद्ध शांत होईल असंही जेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जेलेन्स्की यांनी पुतीन यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया