वाशिंग्टन - रशिया युक्रेन युद्धाने अधिकांश अमेरिकन नागरिकांचे टेन्शन वाढवले आहे. अमेरिकेने थेट युद्धात उडी घेतली तर अण्विक हल्लाही होऊ शकतो, अशी चिंता येथील नागरिकांना वाटते. एका नव्या सर्व्हेमध्ये येथील नागरिकांच्या चिंतेची पातळी दर्शवण्यात आली आहे. यात शीतयुद्ध काळातील प्रतिध्वनी दिसून येत आहे.
अमेरिकेतील नागरिकांना सतावतेय अण्वस्त्र हल्ल्याची भीती -असोसिएटेड प्रेस-एनओआरसी सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स रिसर्चच्या नव्या सर्व्हेनुसार, रशिया अमेरिकेवर थेट अण्वस्त्र हल्ला करेल, या भीतीने जवळपास अर्ध्ये अमेरिकन नागरिक चिंतित आहेत.
रशियाचे आण्विक दल हाय अलर्टवर -माध्यमांतील वृत्तांनुसार, 24 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्र दलाला हाय अलर्टवर ठेवले होते. साधारणपणे 10 पैकी 9 अमेरिकन नागरिकांना, पुतिन युक्रेनविरूद्ध अण्वस्त्र वापरू शकतात, अशी भीती त्यांना वाटते. यामुळे चिंतित आहेत. असं आहे संशोधकांचं मत -एमहर्स्ट, मॅसॅच्युसेट्स येथील निवृत्त संशोधक रॉबिन थॉम्पसन म्हणाले, "रशिया नियंत्रणाबाहेर आहे आणि त्याला कुठल्याही गोष्टीची चिंता आहे, असे मला वाटत नाही, पण त्याची काय इच्छा आहे? त्याच्याकडे अण्वस्त्रे आहेत." रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात कोठेही अण्वस्त्रांच्या वापराचा धोका वाढला आहे, असे 71 टक्के अमेरिकन नागरिकांना वाटते.
उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमामुळेही वाढलंय अमेरिकेचं टेन्शन - हे सर्वेक्षण शुक्रवारी उत्तर कोरियाने आपल्या सर्वात मोठ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे परिक्षण करण्यापूर्वीच करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, 51 टक्के अमेरिकन नागरिकांनी, आपण उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमामुळे अमेरिकेसाठी निर्माण झालेल्या धोक्यामुळे अत्यंत चिंतित आहोत, असे म्हटल्याचे, या सर्व्हेतून दिसून येते.