Russia Ukraine War : "मला गोळी लागलीय, पायाला फ्रॅक्चर झालंय, माझं इथे कोणीच नाही...."; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 02:58 PM2022-03-04T14:58:46+5:302022-03-04T15:20:49+5:30

Russia Ukraine War : गोळी लागलेल्या भारतीय विद्यार्थ्याने स्वत: नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

russia ukraine war harjot singh attacked and shot need help indian embassy | Russia Ukraine War : "मला गोळी लागलीय, पायाला फ्रॅक्चर झालंय, माझं इथे कोणीच नाही...."; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 

Russia Ukraine War : "मला गोळी लागलीय, पायाला फ्रॅक्चर झालंय, माझं इथे कोणीच नाही...."; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 

Next

युक्रेनहून परतणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली असून त्याला उपचारासाठी कीव्हला पाठवण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. व्ही के सिंह यांनी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. यानंतर त्यांला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. युद्धादरम्यान, हे सगळं होत असल्याचंही मंत्री म्हणाले आहेत. तसेच आम्ही जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जखमी विद्यार्थ्याची ओळख पटवली जात आहे. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असंही व्ही के सिंह यांनी म्हटलं होतं. यानंतर आता गोळी लागलेल्या भारतीय विद्यार्थ्याने स्वत: नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

हरजोत सिंह (Harjot Singh) नावाच्या भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली. त्यानंतर त्याला पुन्हा कीव्ह येथे नेण्यात आले. सध्या ते कीव्हमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान एबीपी न्यूजने त्याच्याशी संवाद साधला आहे. त्यावेळी हरजोत सिंहने भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. "माझी एकच विनंती आहे की मला लवकरात लवकर येथून बाहेर काढा, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाला भेटू शकेन. मी भारतीय दूतावासातील जवळपास प्रत्येक व्यक्तीशी बोललो आहे. त्यांनी फक्त दिलासा दिला आहे. अजून कोणतीच मदत इथपर्यंत पोहोचलेली नाही" असं म्हटलं आहे. तसेच घरी पोहोचल्यावर आधी आईने बनवलेले पराठे खाणार असल्याचेही हरजोतने सांगितले.

"माझं इथे कोणीच नाही, मला गोळी लागली, पायाला फ्रॅक्चर झालंय"

"माझं इथे कोणीच नाही. मला गोळी लागली आहे. माझ्या पायाला फ्रॅक्चर झालंय. मी दूतावासाला विनंती केली आहे की मला कारने किंवा इतर काही मार्गाने घेऊन जा. मला चालता येत नाही. पायाला फ्रॅक्चर झालं नसतं तर मी स्वतः चालत बॉर्डरवर गेलो असतो. कीव्हमध्ये सध्या अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. परिस्थिती चांगली नाही" असं देखील हरजोत सिंहने म्हटलं आहे. हरजोत सिंग भारतीय दूतावासापासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. भारत सरकार आणि भारतीय दूतावास यांच्याकडे तो सतत मदत मागत आहे. एबीपी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"डॉक्टरची डिग्री मिळो किंवा न मिळो पण आता मुलाला परत पाठवणार नाही" 

युक्रेनमध्ये अडकलेले काही भारतीयविद्यार्थी देशात परत आले आहेत. प्रशांत सिंह हा विद्यार्थी जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळालं. मुलगा सुखरुप घरी आल्याचं पाहताच आईचे डोळे पाणावले. तिने मुलाला घट्ट मिठी मारली. "डॉक्टरची डिग्री मिळो किंवा न मिळो पण आता पुन्हा मुलाला परत पाठवणार नाही" असं प्रशांतच्या आईने म्हटलं आहे. मुलाचं हार घालून अत्यंत उत्साहात कुटुंबीयांनी स्वागत केलं. प्रशांतच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या तेरनोपिल शहरात प्रशांत सिंह एमबीबीएस करत होता. युद्ध सुरू झाल्यानंतर तो आपल्या काही मित्रांसोबत पायी चालत रोमानिया बॉर्डरवर पोहोचला. तेथून चार दिवसांनंतर तो आता भारतात परतला आहे. दिल्ली पोहोचल्यानंतर त्याला कारने घरी सोडण्यात आलं. 
 

Read in English

Web Title: russia ukraine war harjot singh attacked and shot need help indian embassy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.