शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

Russia Ukraine War: भीषण! युक्रेनमधील बालरुग्णालयावर हल्ला; बचावासाठी नागरिक राजधानीच्या दिशेने धावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 7:49 AM

कीव्ह : रशियाने युक्रेनच्या मारियुपोलमधील बालरुग्णालय आणि प्रसूती वॉर्डवर हल्ला केला असून, यात मोठे नुकसान झाले. कीव्हच्या बाहेरील भागातील ...

कीव्ह : रशियाने युक्रेनच्या मारियुपोलमधील बालरुग्णालय आणि प्रसूती वॉर्डवर हल्ला केला असून, यात मोठे नुकसान झाले. कीव्हच्या बाहेरील भागातील हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक राजधानीच्या दिशेने धावले. रशियाचे हल्ले यापुढे अधिक क्रूर आणि अंधाधुंद असतील, असा इशारा पश्चिमेकडील देशांनी दिला होता. त्यानंतर या घडामोडी घडत आहेत. 

राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक, मुले अडकली आहेत. हा हल्ला म्हणजे अत्याचार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, किती लोक मारले गेले किंवा जखमी झाले, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.मारियुपोलच्या नगर परिषदेने सोशल मीडिया साइटवर सांगितले की, नुकसान प्रचंड होते. दरम्यान, इरपिन या कीव्हच्या उपनगरांतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना एका तात्पुरत्या पुलाच्या निसरड्या लाकडी फळ्या ओलांडून मार्ग काढावा लागला. कारण युक्रेनियन लोकांनी काही दिवसांपूर्वी रशियाची घोडदौड हाणून पाडण्यासाठी कीव्हपर्यंतचा काँक्रीट मार्ग उडवला होता. या भागात अद्यापही तोफगोळ्यांचा आवाज घुमत होता. या सर्व धामधुमीत अग्निशमन दलाच्या जवानांनी एका वृद्धाला गाडीतून सुरक्षित नेले. एका मुलाने सैनिकाचा आधार घेतला आणि एका महिलेने तिच्या कोटाच्या आत मांजर घेऊन पळ काढला. याचवेळी -आमचे युक्रेन- असे शब्द लिहिलेल्या एका अपघातग्रस्त व्हॅनसमोरून ते पुढे सरकले. 

युक्रेनच्या प्रादेशिक संरक्षण दलाचे सदस्य येव्हेन निश्चुक म्हणाले की, आमच्याकडे याक्षणी वेळ कमी आहे. सध्या युद्धविराम झाला असला, तरी कोणत्याही क्षणी तोफगोळे पडण्याचा धोका जास्त आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी नव्याने युद्धविराम जाहीर केला. हजारो नागरिकांना कीव्हच्या आसपासच्या शहरांमधून तसेच मारियुपोल, एनरहोदर आणि व्होल्नोवाखा, पूर्वेकडील इझ्युम आणि ईशान्येकडील सुमी या दक्षिणेकडील शहरांमधून सुरक्षित ठिकाणी पळून जाण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. सुरक्षित कॉरिडॉर स्थापित करण्याचे पूर्वीचे प्रयत्न रशियन हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाले होते.

‘रशियाला दहशतवादी देश जाहीर करा’ लंडन : युक्रेनचे अध्यक्ष व्हाेलोदिमाय झेलेन्स्की यांनी ब्रिटनच्या खासदारांना रशियाला ‘दहशतवादी देश’ असे जाहीर करण्याचे आवाहन केले.  रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी माझा देश युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचा आदेश दिला, असे सांगून झेलेन्स्की यांनी आमचे आकाश सुरक्षित राहावे, यासाठी रशियावर अत्यंत कठोर निर्बंध लादण्याचे आवाहन केले.

 झेलेन्स्की यांनी व्हिडीओ लिंकद्वारे हाऊस ऑफ कॉमन्सला मंगळवारी उद्देशून ऐतिहासिक भाषण केले. या भाषणाला संसद सदस्यांनी उभे राहून प्रतिसाद दिला. “आम्ही तुमच्या मदतीच्या अपेक्षेत आहोत, पाश्चिमात्य देशांसाठीही मदतही अपेक्षित आहे. आम्ही मदतीसाठी आणि बोरिस जॉन्सन यांचेही कृतज्ञ आहोत,” असे ते म्हणाले.

 रशियावर निर्बंध लादण्यासाठी कृपया दबाब वाढवावा आणि कृपया त्या देशाला दहशतवादी देश म्हणून जाहीर करा. आमच्या युक्रेनचे आकाश सुरक्षित राहील याची खात्री करा,” असेही अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया