गेल्या ३३ दिवसांपासून यूक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. यूक्रेननं नाटो संघटनेचं सदस्य स्वीकारू नये यासाठी रशियानं धमकी दिली होती. मात्र यूक्रेननं नाटो सदस्यत्वासाठी अर्ज केल्यानंतर रशियाने यूक्रेनवर हल्ला करत युद्धाची घोषणा केली. रशियाच्या या आक्रमक पवित्रामुळे अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर आर्थिक निर्बंधाची कारवाई केली. तरीही रशियाचे यूक्रेनवर अद्यापही हल्ले सुरूच आहेत.
त्यातच आता रशियन सैन्याकडून होत असलेले अत्याचार पुढे येत आहेत. यूक्रेनमध्ये राहणाऱ्या एका महिलेवर अनेकदा बलात्कार झाल्याचा आरोप आहे. महिलेच्या पतीला गोळी मारून ठार केले. त्यावेळी तिला मुलगाही घटनास्थळी होता. कीव्हमध्ये राहणाऱ्या महिलेवर मुलासमोरच बलात्कार केल्याचा दावा यूक्रेनची खासदार मारिया मेजेंटसेवा यांनी एका मुलाखतीत बोलताना केला आहे. याआधीही यूक्रेनमध्ये काही महिलांवर बलात्कार घडल्याचं समोर आले होते.
खासदार मारिया मेजेंटसेवा म्हणाल्या की, या प्रकरणात आम्ही गप्प बसणार नाही. अखेर या मुलाच्या मनात काय चाललं असेल. ज्याच्या डोळ्यासमोर आईवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलं. त्यावर यूक्रेनच्या प्रोसोक्यूटर जनरल इरिना वेनेदिक्तोवा यांनीही चौकशीबाबत सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, जे रशियन सैनिक घरात घुसले होते ते दारुच्या नशेत होते. या सैनिकांनी सुरुवातीला महिलेच्या पतीची हत्या केली. त्यानंतर महिलेवर वारंवार बलात्कार केला. इतकेच नाही तर या सैनिकांनी बलात्कारानंतर त्या लहान मुलालाही धमकी दिली.
यूक्रेनची प्रोसेक्यूटर जनरल इरिना वेनेदिक्तोवा यांनी सांगितले की, २ सैनिकांनी याआधी कीव्हच्या ब्रोवरीत महिलेवर हल्ला केला होता. यातील एका सैनिकाची ओळख पटली आहे. त्याच्या आरोपही निश्चित करण्यात आले आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, एक महिला जी मागील आठवड्यात यूक्रेनच्या इरपिन नावाच्या शहरातून पळून आली होती. तिने रशियन सैन्यावर बलात्काराचे आरोप करत गोळी मारत असल्याचं म्हटलं आहे. अनातासिया तरान नावाची ३० वर्षीय महिला इरपिनमध्ये रशियाच्या हल्ल्यापूर्वी वेटर म्हणून काम करत होती तिचंही जगणं आता कठीण झालं आहे. रशियन सैन्याकडून होणारे अत्याचार आणि महिलांवर बलात्कार या घटनेने यूक्रेनच्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.