Russia Ukraine War: ...तर भारताला चालेल का? पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला का केला, अनिवासी भारतीय आमदाराने सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:54 PM2022-03-02T17:54:11+5:302022-03-02T17:56:53+5:30
Russia Ukraine War, dr abhay kumar singh backs Putin: डॉ अभय कुमार सिंह हे यूनाइटेड रशिया पार्टी (United Russia Party) चे सदस्य आहेत. ते आमदार आहेत. त्यांनी म्हटले की, लष्करी कारवाईपूर्वी रशियाने युक्रेनला चर्चा करण्यासाठी खूप वेळ दिला होता. पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे कारण योग्य आहे.
युक्रेनवर हल्ला करण्यावरून जगभरात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका होत आहे. तर दुसरीकडे अनिवासी भारतीय असलेल्या पुतीन यांच्या आमदारांनी पुतीन यांचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
डॉ अभय कुमार सिंह हे यूनाइटेड रशिया पार्टी (United Russia Party) चे सदस्य आहेत. ते आमदार आहेत. त्यांनी म्हटले की, लष्करी कारवाईपूर्वी रशियाने युक्रेनला चर्चा करण्यासाठी खूप वेळ दिला होता. पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे कारण योग्य आहे. जर चीनने बांग्लादेशमध्ये आपल्या सैन्याचे तळ उभारण्यास सुरुवात केली तर भारताची प्रतिक्रिया काय असेल? दुष्मनाने भारताला चारही बाजुंनी घेरलेले चालणार आहे का? यातच पुतीन यांच्या निर्णयामागचे कारण लपलेले आहे.
डॉ अभय कुमार सिंह (Dr. Abhay Kumar Singh) यांनी सांगितले की, युक्रेनला तेव्हा खूप समजाविण्याचा प्रयत्न झाला. युक्रेन जर नाटोमध्ये सहभागी झाला तर त्यांचे लष्कर आणि शस्त्रास्त्रांची थेट तैनाती रशियाच्या सीमेवर केली जाणार होती. युक्रेन आमचा शेजारी देश होता. यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पुतीन आणि आमच्या संसदेकडे युक्रेनवर आक्रमण करण्यावाचून पर्याय नव्हता. या परिस्थितीतमुळे युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रशिया खरेच अणुबॉम्ब टाकणार का?
सिंह यांनी या वृत्ताचे खंडन केले. रशियाविरोधात कट रचणाऱ्या पश्चिमी देशांपासून रशियाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी तो अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ कोणावर अण्वस्त्र हल्ला करणे असा नाही तर आपल्या देशाचे रक्षण करणे हा होतो. रशियाचे संरक्षण करणे सर्वात प्राधान्याचे आहे, त्याचाशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. यासाठी काहीही गमवावे लागले तरी चालेल, असे ते म्हणाले.
डॉ अभय कुमार सिंह हे बिहारच्या पटना येथील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बिहारमध्येच झाले. 1991 मध्ये ते रशियाला गेले. Kursk State Medical University मधून पदवीधर झाले. त्यानंतर ते भारतात आले आणि हॉस्पिटल सुरु केले. मात्र, भारतात त्यांनी औषधांची कंपनी सुरु केली आणि पुन्हा रशियाला गेले. तिथे रिअल इस्टेटमध्ये जम बसविला आणि नंतर २०१५ मध्ये राजकारणात आले. पुतीन यांच्या यूनाइटेड रशिया पार्टीचे २०१५ मध्ये सदस्य झाले. २०१८ मध्ये ते कुर्स्कमधून निवडणूक लढले आणि आमदार झाले.