Russia Ukraine War: भारतीयांना खार्किव सोडण्याचे निर्देश, गोळीबारादरम्यान दूतावासनं जारी केली अ‍ॅडव्हायजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 06:06 PM2022-03-02T18:06:32+5:302022-03-02T18:07:37+5:30

युक्रेनमधील खार्किवमध्ये असलेल्या सर्व भारतीयांना ‘अपल्या सुरक्षितते’साठी ताबडतोब शहर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Russia Ukraine War Indians were instructed to leave the kharkiv city the embassy issued advisory | Russia Ukraine War: भारतीयांना खार्किव सोडण्याचे निर्देश, गोळीबारादरम्यान दूतावासनं जारी केली अ‍ॅडव्हायजरी

Russia Ukraine War: भारतीयांना खार्किव सोडण्याचे निर्देश, गोळीबारादरम्यान दूतावासनं जारी केली अ‍ॅडव्हायजरी

googlenewsNext

नवी दिल्ली - युक्रेन आणि रशिया यांच्यात भीषण युद्ध सुरू असतानाच भारत सरकारने एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यात, युक्रेनमधील खार्किवमध्ये असलेल्या सर्व भारतीयांना ‘अपल्या सुरक्षितते’साठी ताबडतोब शहर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रात्रीपर्यंत सर्वांना शहर सोडण्याच्या सूचना - 
युक्रेनमध्ये भारतीय दूतावासाने खार्किवमधील भारतीय नागरिकांसाठी तातडीची अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हणण्यात आले आहे की, खार्किव तत्काळ सोडायला हवे, लवकरात लवकर पिसोचिन, बेझल्युडोव्का आणि बाबेच्या दिशेने या. त्यांना आज सायंकाळपर्यंत (युक्रेनच्या वेळेनुसार) या ठिकाणी पोहोचावे लागेल. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, सर्व भारतीयांना आज रात्री 9:30 वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शहर सोडण्यास सांगण्यात आले आहे.



खार्किव धोकादायक -
सध्या रशियन सैन्याकडून खार्किववर जोरदार हल्ले सुरू आहेत. अशा स्थितीत तेथे अडकलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना आणि इतर नागरिकांना भारत सरकारकडून खार्किव सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खार्किवमध्ये नुकताच सिटी काउंसिलच्या इमारतीवर भयंकर हल्ला झाला आहे.
 

Web Title: Russia Ukraine War Indians were instructed to leave the kharkiv city the embassy issued advisory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.