नवी दिल्ली - युक्रेन आणि रशिया यांच्यात भीषण युद्ध सुरू असतानाच भारत सरकारने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात, युक्रेनमधील खार्किवमध्ये असलेल्या सर्व भारतीयांना ‘अपल्या सुरक्षितते’साठी ताबडतोब शहर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रात्रीपर्यंत सर्वांना शहर सोडण्याच्या सूचना - युक्रेनमध्ये भारतीय दूतावासाने खार्किवमधील भारतीय नागरिकांसाठी तातडीची अॅडव्हायजरी जारी केली आहे. अॅडव्हायजरीमध्ये म्हणण्यात आले आहे की, खार्किव तत्काळ सोडायला हवे, लवकरात लवकर पिसोचिन, बेझल्युडोव्का आणि बाबेच्या दिशेने या. त्यांना आज सायंकाळपर्यंत (युक्रेनच्या वेळेनुसार) या ठिकाणी पोहोचावे लागेल. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, सर्व भारतीयांना आज रात्री 9:30 वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शहर सोडण्यास सांगण्यात आले आहे.