शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

१ वर्ष झाले, कधी थांबणार युद्ध?; मूळ प्रश्नावर तोडगा निघेल याचीही शाश्वती नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 8:22 AM

रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा सगळ्या जगालाच बसत आहेत. खनिज तेल, शेती उत्पादने महागली आहेत. वर्ष होत आले... या युद्धाचा शेवट होणार तरी कधी?

समीर परांजपे, मुख्य उपसंपादक 

रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी आक्रमण केले त्याला एक वर्ष पूर्ण होईल. हा झाला नैमित्तिक कालावधी. मात्र या दोन देशांमधील संघर्ष त्याहूनही जुना आहे. युक्रेनमध्ये असलेल्या रशियन समर्थकांना पाठबळ देत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक डाव आखला. ह्या घडामोडीदेखील नेमक्या २०१४च्या फेब्रुवारी महिन्यातच घडल्या आहेत. त्यावेळी रशियाने चढाई करत युक्रेनचा क्रिमिया हा भाग घशात घातला. युक्रेनमधील रशिया समर्थकांना रसद पुरवत पुतीन आणखी लचके तोडण्याची तयारी करू लागले. 

२०१४ साली युक्रेनमध्ये युरोमेडन निदर्शनांना सुरुवात झाली व त्यातून क्रांतीचे वारे वाहू लागले. रशियाधार्जिणे युक्रेनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच हे पायउतार झाले. त्यानंतर काही दिवसांतच रशियाच्या समर्थकांनी उचल खाल्ली आणि युक्रेनच्या पूर्व तसेच दक्षिण भागांमध्ये वणवा पेटला. याचा फायदा घेत रशियाच्या लष्कराने क्रिमियाचा ताबा घेतला. त्यानंतर युक्रेनमधील डोनबास प्रांतात उठाव झाला. त्या देशातून फुटून डोंटेस्क पीपल्स रिपब्लिक (डीपीआर) व लुहांस्क पीपल्स रिपब्लिक (एलपीआर) असे दोन स्वतंत्र देश निर्माण झाल्याची घोषणा बंडखोरांनी केली. 

युद्धाच्या आधी... युक्रेनवर आम्ही आक्रमण करणार नाही, हीच भूमिका रशियाने घेतल्याचे दाखवले होते. युक्रेनने नाटो संघटनेत सामील होऊ नये, त्याला युरोपीय देशांनी कोणतीही मदत करू नये, यासाठी पुतीन यांनी खूप आटापिटा केला. मात्र, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमिर जेलेंस्की त्याला दाद देत नव्हते. 

सर्वांना स्वतःच्या स्वार्थाचीच चिंतायुरोपातील अनेक देश रशियाकडून नैसर्गिक वायू, पेट्रोल आदींची निर्यात करतात. युक्रेनवर आक्रमण झाल्यानंतर युरोपीय देशांनी रशियाचा तीव्र निषेध करावा, असा अमेरिकेचा आग्रह होता. पण तो लगेच मान्य झाला नाही. प्रत्येक देशाने आपले हितसंबंध सांभाळत रशियाचा निषेध केला. याला अगदी जर्मनी, इंग्लंडही अपवाद नाही. युद्धाचा विषय पुतीन फारच ताणायला लागल्यानंतर मग अमेरिका, युरोपीय देशांनी रशियावर अनेक कडक निर्बंध लादले. 

भारताची भूमिकायुक्रेन व रशिया यांचे युद्ध किती काळ सुरू राहणार, हे अनिश्चित आहे. त्यात दोन्ही देशांची किती हानी झाली हा मुद्दा वेगळाच आहे. प्रश्न इतकाच उरतो की, या संघर्षात भारताची नेमकी भूमिका काय? युद्ध सुरू झाले तेव्हा भारताने रशियाचा निषेध केला नव्हता. अमेरिकेचा दबाव असूनही भारताने रशियाशी व्यापारी संबंध तोडले नाहीत. रशियाकडून आपण मोठ्या प्रमाणावर लष्करी सामग्री, इंधन तेल विकत घेतो. याचा विचार करून मोदी सरकारने युक्रेन मुद्द्यांबाबत व्यवहारी भूमिका घेतली. रशियाला युद्ध थांबविण्याचे व चर्चेतून प्रश्नावर तोडगा काढण्याचे आवाहन केले. ह्या भूमिकेने ना रशियाशी आपले संबंध बिघडले ना अमेरिकेकडून सहकार्य मिळविण्यात अडथळा आला. युद्धासारखे प्रसंग अनेकदा राजनैतिक कसोटीही पाहत असतात. 

इराण - इराक, अफगाणिस्तान - रशिया, अफगाणिस्तान - अमेरिका, इराक - अमेरिका अशा अनेक युद्धांतून मूळ प्रश्न सुटले नाहीत. युक्रेन युद्धातूनही संबंधित प्रश्नावर तोडगा निघेल, याची काहीही शाश्वती नाही. पण युक्रेन जागतिक नकाशावरून अस्तंगत होणार नाही इतकी काळजी आंतरराष्ट्रीय समुदाय घेईल, असे मात्र आवर्जून वाटते.

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया