Joe Biden Russia Ukraine War - युक्रेनमध्ये लष्कर पाठवणार नाही, पण रशियाला मनमानीही करू देणार नाही : जो बायडेन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 08:36 AM2022-03-02T08:36:32+5:302022-03-02T08:37:15+5:30
Joe Biden Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्टेट ऑफ द युनियन अॅडरेसला (State Of the Union Address) संबोधित केलं.
Joe Biden Russia Ukraine War : गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध छेडलं आहे. या युद्धात युक्रेनला मोठं नकसान झालं असून युक्रेननं अन्य देशांकडे मदतही मागितली होती. दरम्यान, रशियानं युद्धाची सुरूवात करून मोठी चूक केली असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी केलं. रशिया युक्रेन युद्धादरम्यान बायडेन यांनी स्टेट ऑफ द युनियन अॅड्रेसला संबोधित केलं. यावेळी त्या ठिकाणी युक्रेनचे राजदूतदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी युक्रेनमध्ये सैन्य उतरवणार नसलो तरी रशियाला मनमानीही करू देणार नसल्याचं स्पष्ट केलं.
"आम्ही युरोपियन संघासोबत मिळून काम करत आहोत. यामध्ये युरोपिय सहकाऱ्यांना साथ देत रशियात शासन करणाऱ्या लोकांच्या बोटी, त्यांची लक्झरी अपार्टमेंट, खासगी जेट जप्त केली जात आहेत. जेव्हा या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पुतिन यांनी युक्रेनसोबत सुरू केलेल्या युद्धामुळे रशियाला कमकुवत आणि जगातिल अन्य देशांना ताकदवान म्हटलं जाईल," असं बायडेन यावेळी म्हणाले.
The US Dept of Justice is assembling a dedicated task force to go after the crimes of Russian oligarchs. We are joining with our European allies to find and seize your yachts, your luxury apartments, your private jets: US President Biden during the State of the Union address pic.twitter.com/vJlZxXbF72
— ANI (@ANI) March 2, 2022
जेव्हा हुकूमशहांना त्यांच्या आक्रमकतेची किंमत मोजावी लागत नाही तेव्हा ते अधिक अराजकता निर्माण करतात हे आपण इतिहासातून शिकलो आहोत. तेव्हा ते असं करत राहतात. त्याची किंमत आणि धोका जगाला मोजावी लागत असल्याचंही ते म्हणाले. "अमेरिका आणि सहकारी देश मिळून नाटो देशांच्या इंच अन् इंच जमिनीचं संरक्षण करतील. अमेरिकेनं रशियावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. आम्ही रशियाच्या खोटेपणाचा सामना सत्यानं केला आहे. युक्रेनला सैन्य, आर्थिक मदत आणि मानवीय मदत केली जात आहे," अशी माहितीही बायडेन यांनी दिली.
The US & our allies will defend every inch of NATO territory with full force of our collective power. Ukrainians are fighting back with pure courage. Putin may gain makes gains on the battlefield but he'll have to continue to pay a high price over the long run: US President Biden pic.twitter.com/Bd589aaHFI— ANI (@ANI) March 2, 2022
पुतिन जगापासून अलिप्त
"पुतिन यावेळी जगापासून इतके अलिप्त झाले आहेत, जितके ते यापूर्वी कधीही नव्हते. युरोपियन युनियनचे तब्बल २७ देश यावेळी युक्रेनसोबत आहेत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.