Joe Biden Russia Ukraine War : गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध छेडलं आहे. या युद्धात युक्रेनला मोठं नकसान झालं असून युक्रेननं अन्य देशांकडे मदतही मागितली होती. दरम्यान, रशियानं युद्धाची सुरूवात करून मोठी चूक केली असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी केलं. रशिया युक्रेन युद्धादरम्यान बायडेन यांनी स्टेट ऑफ द युनियन अॅड्रेसला संबोधित केलं. यावेळी त्या ठिकाणी युक्रेनचे राजदूतदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी युक्रेनमध्ये सैन्य उतरवणार नसलो तरी रशियाला मनमानीही करू देणार नसल्याचं स्पष्ट केलं.
"आम्ही युरोपियन संघासोबत मिळून काम करत आहोत. यामध्ये युरोपिय सहकाऱ्यांना साथ देत रशियात शासन करणाऱ्या लोकांच्या बोटी, त्यांची लक्झरी अपार्टमेंट, खासगी जेट जप्त केली जात आहेत. जेव्हा या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पुतिन यांनी युक्रेनसोबत सुरू केलेल्या युद्धामुळे रशियाला कमकुवत आणि जगातिल अन्य देशांना ताकदवान म्हटलं जाईल," असं बायडेन यावेळी म्हणाले.