Russia-Ukraine War: युद्ध जगतातला 'खली' युक्रेनच्या जमिनीवर उतरला; बेस्ट स्नायपर Wali दिवसाला ४० सैनिकांना टिपतो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 02:37 PM2022-03-10T14:37:54+5:302022-03-10T14:38:24+5:30
Russia-Ukraine War: वली हा कॅनडाच्या जॉइंट टास्क फोर्स (JTF-2) युनिटचा जवान आहे. या युनिटच्या स्नायपर्सच्या नावावर सर्वात लांब पल्ल्याचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम आहे.
युक्रेन-रशिया युद्धाला आता १५ दिवस लोटले आहेत. ४८ तासांत युक्रेन पाडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची झोप उडाली आहे. जगभरातून रशियाच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु झाले असून यातून तरण्याची शक्यता कमी होत चालली आहे. अद्याप रशियाला युक्रेनमध्ये फारसे यश आलेले नाही. युक्रेनचे सैनिक आणि नागरिकांसह आता परदेशी नागरिक देखील युद्धात उतरू लागले आहेत. यातच रशियन सैनिकांना घाम फोडणारी बातमी आली आहे. (World's most famous sniper)
जगातील सर्वात बेस्ट स्नायपर म्हणून युद्ध जगतात नावाजला गेलेल्या वलीने (Wali) युक्रेनच्या युद्धभूमीमध्ये पाय ठेवले आहेत. त्याची क्षमता एवढी प्रचंड आहे की तो एका दिवसाला ४० सैनिकांना जागच्या जागी टिपू शकतो. वली हा एक फ्रेंच-कॅनडियन कॉम्प्युटर सायंटिस्ट आहे. त्याने अफगाणिस्तानमध्ये दोन वेळा स्पेशल ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता. २००९ ते २०११ मध्ये वलीने अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले होते. यामुळेच त्याला वली नावाची उपाधी देण्यात आली.
वर्ल्ड मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने युक्रेनमध्ये येऊन मला खूप चांगले वाटत आहे. मला युक्रेनच्या लोकांना मदत करायची आहे. रशियन सैन्य युक्रेनमधील निरपराध लोकांवर बॉम्बफेक करत आहे. आठवडाभरापूर्वी मी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये व्यस्त होतो. पण आता तो बंदूक घेऊन रणांगणात उतरलो आहे. युक्रेनच्या युद्धाचा भाग व्हावे हे पत्नीला पसंत नव्हते. पण मी कठोर निर्णय घेतला आणि इथे आलो.
वली हा कॅनडाच्या जॉइंट टास्क फोर्स (JTF-2) युनिटचा जवान आहे. या युनिटच्या स्नायपर्सच्या नावावर सर्वात लांब पल्ल्याचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम आहे. या स्नायपर्सनी साडे तीन किमीवरील लक्ष्य भेदले आहे. जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी परदेशी सैनिकांना रशियाविरुद्ध युद्धासाठी आमंत्रित केले, तेव्हा वलीने न घाबरता युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला.
nipers देखील श्रेणींमध्ये विभागले जातात. एक स्नायपर जो दररोज 5 ते 6 शत्रूंना लक्ष्य करतो तो चांगला स्नायपर मानला जातो. याशिवाय 7 ते 10 शत्रूंना लक्ष्य करणारा स्नायपर सर्वोत्तम मानला जातो. मात्र एका दिवसात 40 लोकांना टार्गेट करण्याची क्षमता वलीमध्ये आहे.