Russia-Ukraine War:युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या 9 महिन्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धातून रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. आता युद्धभूमीतून समोर आलेल्या एका बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. जगभरातील डॉक्टरही या बातमीने चक्रावून गेले आहेत. बातमी अशी की, डॉक्टरांना एका सैनिकाच्या ऑपरेशनदरम्यान, त्याच्या छातीत जिवंत बॉम्ब आढळून आला आहे. जिवंत बॉम्ब माणसाच्या छातीत कसा बसवला आणि हा बॉम्ब छातीत का फुटला नाही? हेच कुणाला समजत नाहीये.
छातीत बॉम्ब कोणी आणि कसा बसवला?डेली स्टारच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रिपोर्टनुसार, ज्या रशियन लष्करी सैनिकाच्या छातीत हा बॉम्ब ठेवला होता, त्याचे नाव निकोले पासेन्को आहे. हा रशियन सैनिक अनेक महिन्यांपासून युक्रेनच्या सैन्याविरोधात लढत होता. यादरम्यान युक्रेनच्या लष्कराने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. जेव्हा निकोले पासेंको याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या छातीची शस्त्रक्रिया केली. यावेळी डॉक्टरांना त्याच्या छातीत जिवंत बॉम्ब आढळून आला.
ऑपरेशन दरम्यान स्फोट होण्याची भीती होतीविशेष म्हणजे हा जिवंत बॉम्ब छातीत कसा, कधी आणि कुठून आला हे डॉक्टर किंवा त्या सैनिकाला सांगता येत नाहीये. गुरुवारी रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेच या विचित्र प्रकरणाला दुजोरा दिला आहे. रशियाची अधिकृत वृत्तसंस्था टासने सांगितले की, या सैनिकावर सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्टच्या मँड्रिक सेंट्रल मिलिटरी क्लिनिकल हॉस्पिटलमधील शल्यचिकित्सकांनी उपचार केले. यावेळी अतिशय कठीण अशा परिस्थितीत त्या सैनिकाच्या छातीतून बॉम्ब काढण्यात आला आणि त्याचे प्राण वाचवले.