Russia Ukraine War Updates : युक्रेनमध्ये रशियन हल्ल्याच्या (Russia Ukrraine War) दहाव्या दिवशी रशियाने तात्पुरता युद्धविराम जाहीर केला आहे. नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर उपलब्ध करून देणार असल्याचेही रशियाने म्हटले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताची पुष्टी केली असून स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ ते ४ या वेळेत युद्धविराम घोषित करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी रशिया युक्रेनच्या मारियुपोल आणि वोल्नोवाखा शहरांमध्ये मानवतावादी कॉरिडॉर उपलब्ध करून देणार असल्याचंही म्हटलंय. यावेळी रशिया गोळीबार थांबवेल. रशियाने नागरिकांना शहर सोडण्याचे आवाहन केले आहे.तर दुसरीकडे रशियावर निर्बंध लादणाऱ्या देशांची संख्याही वाढू लागली आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता सिंगापूरनेही रशियावर आर्थिक निर्बंध जाहीर केले आहेत. सिंगापूरने रशियन सेंट्रल बँक आणि काही इतर रशियन बँकांवर निर्बंध लादले आहेत. यासोबतच रशियाच्या युक्रेनमधील लष्करी कारवाईमुळे देशातील निर्यातीवरही बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी दिली.
यामध्ये प्रामुख्यानं तटस्थ आणि अण्वस्त्र नसलेला देश होणं, त्यांच्याद्वारे क्रिमियाला रशियाचा भाग मानणं आणि पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी प्रदेशांचे सार्वभौमत्व यांचा समावेश आहे. युक्रेन सरकार तर्कसंगत आणि सकारात्मक दृष्टीकोन दर्शवेल अशी आशाही यावेळी व्यक्त करण्यात आली.