रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडून एकमेकांविरोधात वेगवेगळे दावे केले जात आहेत. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याची मोठी हानी घडवून आणल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे. याच दरम्यान युद्ध पेटलेलं असताना माणुसकीचं दर्शन घडवणारी एक घटना आता समोर आली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या जुन्या बाईकने 48 तास 2414 किलोमीटरचा प्रवास करून मोलाचं काम केलं आहे. युक्रेनमधील लोकांना औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला आहे.
डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, लियोन क्रिब असं या व्य़क्तीचं नाव असून त्याने ब्रिटनमधील वेस्ट ससेक्सच्या चेस्टरमधून आपल्या जुन्या बाईकने प्रवास सुरू केला. लियोनने फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, जर्मनी आणि पोलंडचा प्रवास केला. त्यानंतर औषधं घेऊन युक्रेनच्या कीव्हमध्ये पोहोचला. त्याने फ्रान्सच्या आर्मीसाठी देखील काम केलं आहे. त्याने पाच देशांतून प्रवास करत कीव्ह गाठलं.
रशियाने हल्ला केल्यामुळे युक्रेनच्या रुग्णालय़ांचं मोठं नुकसान झालं आहे. लियोनने दिलेल्य़ा माहितीनुसार, त्याला Korczowa बॉर्डरवर वाट पाहावी लागली. त्यानंतर त्याने पोलंड बॉर्डर पार करून कीव्हच्या दिशेने प्रवास केला. लियोनने आपल्यासोबत बँडेज, अँटीसेप्टिक, सेलिन फ्लूड, ट्रॉमा किट्स आणि इतर मेडिकल उपकरणं घेतली होती. ते 48 तास खूप कठीण होते पण लोकांची मदत करता आल्याने मला खूप चांगलं वाटत आहे असं म्हटलं आहे. लियोनच्या कुटुंबाला त्याची काळजी वाटत होती. पण त्याने जाण्याचा निर्णय पक्का केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी मुलीसाठी धावला भारतीय तरुण; वाचवला जीव
एका भारतीय तरुणाने पाकिस्तानी मुलीचा जीव वाचवला आहे. तिला सुखरूपरित्या रोमानिया बॉर्डरवर पोहोचलं आहे. पाकिस्तानी दूतावासाने अंकितचं भरभरून कौतुक केलं आहे. "भारतीय असलेल्या अंकितने आमच्या मुलीला आमच्याकडे आणलं आणि आमची मुलगी वाचली आहे. बेटा! खूप खूप धन्यवाद. दोन्ही देशातील जनतेने एकमेकांचे पाय खेचण्याची नाही, तर प्रेम आणि पाठिंबा दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्या द्वेषापेक्षा आपली मुलं महत्त्वाची आहेत" असं म्हटलं आहे.