Russia-Ukraine War:…तर ‘अशा’ जवानासोबत मी संबंध ठेवेन; मॉडेलची रशिया-यूक्रेनच्या सैन्याला विचित्र ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:17 PM2022-03-01T12:17:38+5:302022-03-01T12:25:45+5:30
रशिया-यूक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून ती वारंवार सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत आहे.
लंडन – गेल्या गुरुवारपासून रशियानं यूक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. रशियानं यूक्रेनमधील अनेक शहरांवर कब्जा मिळवला असून राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया प्रयत्न करतंय. यूक्रेनवर सातत्याने बॉम्बहल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. त्यात रशियाच्या या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. रशियाच्या हल्ल्यात लहान मुलं, महिला यांचाही बळी जात असल्याचं दुर्दैवी चित्र समोर येत आहे.
अशावेळी एका मॉडेलनं रशियाच्या हल्ल्याचा निषेध करत रशियन सैन्यातील जवानांना संबंध बनवण्याची ऑफर दिली आहे. या मॉडेलनं म्हटलंय की, रशियन सैन्य जर त्यांचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे आदेश ऐकणार नाहीत आणि यूक्रेनमधून परतले तर ती प्रत्येक जवानासोबत सेक्स करण्यास तयार आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ट्विटर यूजर बॅड किट्टीचं एडल्ट साइट only fans आणि इन्स्टाग्रामवर लिली समर्स(Lilly Summers) नावानं अकाऊंट आहे.
रशिया-यूक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून ती वारंवार सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत आहे. आता तिने रशियन सैन्याकडून सुरु असलेला रक्तपात थांबवण्यासाठी जवानांना सेक्सची ऑफर दिली आहे. मी प्रत्येक रशियन जवानासोबत सेक्स करण्यास तयार आहे. जे यूक्रेनविरोधात द्वेष आणि हत्यार सोडण्यास तयार आहेत असं मॉडेलनं सांगितले आहे. लिली समर्स सुरुवातीपासून यूक्रेनचं समर्थन करत आहे. यूक्रेनच्या झेंड्यासोबत तिने शांतता राखण्याचं आवाहन केले होते.
रशियन सैनिकांनी राष्ट्रपती पुतिन यांचे आदेश न मानता यूक्रेन सोडून पुन्हा रशियात जावं. जर रशियन जवानांपैकी कुणी हे ऐकायला तयार असेल तर मी त्यांच्यासोबत संबंध ठेवेन. ही माझी ऑफर प्रत्येक जवानाला आहे असं मॉडेल लिली समर्सनं स्पष्ट केले आहे. इतकचं नाही तर जर कुठलाही रशियन मृत्युमुखी पडेल तर मी न्यूड फोटो शेअर करेन. रशियन टँकर्स नष्ट झाला तर माझ्या फोलोअर्सला एक सेक्सी व्हिडीओ मिळेल आणि जर रशियन विमान उद्दध्वस्त केले तर त्याच्यासोबतही मी सेक्स करण्यास तयार असल्याची ऑफर यूक्रेन सैनिकांना दिली आहे. रशियानं यूक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा जगभरात अनेकजण निषेध करत आहेत. त्यात सेलिब्रिटीपासून अनेक उद्योगपतींचा समावेश आहे.