Russia Ukraine War: यूक्रेननंतर आता पुतिन यांचं पुढचं टार्गेट कोण?; बेलारूसच्या राष्ट्रपतीनं केलं उघडं, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 11:05 AM2022-03-02T11:05:58+5:302022-03-02T11:06:10+5:30
रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान आता बेलारूसच्या (Belarus) राष्ट्रपतींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मॉस्को – यूक्रेनवर रशियानं हल्ला केल्यानंतर भलेही अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशिया आणि त्याठिकाणचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांच्याविरोधात निर्बंधाचे पाऊल उचलले आहे. परंतु असे अनेक देश आहेत जे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या रशियाचं समर्थन करत आहेत. पुतिन यांच्या सहकाऱ्यांमध्ये पहिलं नाव बेलारूसच्या राष्ट्रपतींचं येतं.
रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान आता बेलारूसच्या (Belarus) राष्ट्रपतींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याचं प्रसारण सरकारी टीव्ही चॅनेलवर झालं. यात यूक्रेनवर विजय मिळवल्यानंतर रशियाचा पुढील टार्गेट कोण आहे? याचा खुलासा त्यांनी केला आहे. यूक्रेननंतर रशिया आणि पुतिन यांचा निशाणा मोल्दोवा(Moldova) असेल. मेल ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, भलेही आतापर्यंतच्या लढाईत बेलारूसनं थेट लढाईत सहभाग घेतल्याचं समोर आलं नाही. मात्र युद्धात बेलारूस मैदानात उतरल्याचा दावा यूक्रेनच्या गुप्तचर खात्याने केला आहे.
बेलारूसचे ३०० टँक लढाऊ विमानासह यूक्रेनमध्ये गस्त घालत आहेत. त्यामुळे बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्जेंडर लुकाशेंको यांनी पुतिन सैन्याचं पुढील लक्ष्य मोल्दोवावर हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे संकेत देणारे आहे.लुकाशेंकोनं सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बैठकीत एक नकाशा दाखवत त्यांच्या रणनीतीची घोषणा केली आहे. त्यावेळी ते मिलिट्री ऑपरेशन्सची चर्चा करत होते. या नकाशात रशिया, बेलारूस, यूक्रेन आणि काही युरोपीय देशांच्या सीमा आणि सेंटर्सवर लक्ष्य होते. एका स्टिक प्वॉइंटनं ते ब्रीफ करत आहेत. त्यात नॉर्थ डायरेक्शनहून कीवच्या दिशेने आणि क्रीमियाहून खेरसॉनच्या दिशेने हालचाल होत असल्याचं दिसून येत आहे.
चुकीनं पुतिन यांचा प्लॅन उघड झाला?
या व्हिडीओत हल्ल्याशी निगडीत अशाही खूणा आहेत ज्याठिकाणी रशियानं एअरफोर्स अथवा लष्करी तळाला टार्गेट केले नाही. त्याचवेळी ओडेसा पोर्ट सिटीहून मोल्दोवाच्या दिशेने इशारा करताना ते काही चर्चा करत आहेत. ज्याने भविष्यात रशियानं यूक्रेनच्या शेजारील राष्ट्रांमध्ये सैन्य कारवाई करण्याचा विचार करत आहेत. यूक्रेनमध्ये सध्या सैन्य जवानासोबत सर्वसामान्यही रशियाच्या लष्करी कारवाईविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे ७ दिवस उलटले तरीही रशियाला यूक्रेनला हरवता आलं नाही. त्यात या बैठकीचं लाईव्ह टेलिकास्ट होत असल्याने चुकीनं पुतिन यांचा प्लॅन उघड झाला असं बोललं जात आहे.