Russia Ukraine War: आई, मी बंकरमध्ये आहे, समोर स्फोट होतायेत; घाबरु नको सांगत पोरीनं फोन बंद केला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:39 AM2022-02-25T10:39:55+5:302022-02-25T10:41:59+5:30

रशियाच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी हजारो लोकांना बंकरमध्ये सुरक्षित ठेवले आहेत. सृष्टीही त्या बंकरमध्ये आहे.

Russia Ukraine War: Mom, I'm in the bunker, the front is exploding; Don't be afraid, Indian Daughter Called her Mother over Ukraine Situation | Russia Ukraine War: आई, मी बंकरमध्ये आहे, समोर स्फोट होतायेत; घाबरु नको सांगत पोरीनं फोन बंद केला

Russia Ukraine War: आई, मी बंकरमध्ये आहे, समोर स्फोट होतायेत; घाबरु नको सांगत पोरीनं फोन बंद केला

googlenewsNext

विदिशा  - रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्याठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. एअरस्पेस बंद केल्यानं विमान वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी आजही यूक्रेनमध्ये अडकून बसले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशातील ४६ विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकलेत. त्यात विदिशा येथील सृष्टी विल्सन या मुलीचाही समावेश आहे. ती यूक्रेनची राजधानी कीव येथे अडकली आहे ज्याठिकाणी रशियन सैन्यानं हल्ल्याला सुरुवात केली आहे.

रशियाच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी हजारो लोकांना बंकरमध्ये सुरक्षित ठेवले आहेत. सृष्टीही त्या बंकरमध्ये आहे. सकाळी आईसोबत सृष्टीने संवाद साधला आणि त्याठिकाणी सुरु असलेल्या परिस्थितीची अनुभव सांगितला. सृष्टीच्या आईनं सांगितले की, सकाळी ८.४५ वाजता सृष्टीचा कॉल आला होता. ती बंकरमध्ये असल्याचं म्हणाली. समोरील बिल्डिंगमध्ये बॉम्बहल्ला होत असल्याचं ती बोलली. तुम्ही घाबरू नका. आम्ही बंकरमध्ये आहोत. त्यानंतर सृष्टीनं फोन बंद केला. बंकरमध्ये नेटवर्क आणि अन्य वस्तूंचा सामना करावा लागत आहे. मी नंतर बोलते सांगून तिने फोन ठेवला असं त्यांनी सांगितले.

बंकरमध्ये अनेक लोकं अडकली आहेत. सृष्टी एमबीबीएस शिक्षणासाठी यूक्रेनला गेली होती. मागील ५ वर्षापासून ती कीवमध्ये राहते. सृष्टीची आई वैशाली जिल्हा रुग्णालयात नर्स म्हणून आहे. युद्धाची बातमी मिळताच सृष्टीला मायदेशी आणण्यासाठी आई वैशाली प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री संपर्क कक्षाला कळवलं पण त्यांनी यूक्रेनच्या स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. इतकंच नाही तर वैशाली विल्सन यांना पीएमओच्या नावावर बनावट कॉल आला. यूक्रेनमधून मुलीला परत आणण्यासाठी ४२ हजारांची मागणी केली. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. हा प्रकार लक्षात घेऊन राज्यातील आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी यांनी सृष्टी विल्सन  हिच्याशी संवाद साधत तिला सुखरुप मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

लेकीचा निरोप घेताना भावूक झाला पिता

रशियानं युक्रेनच्या लष्कराचे ७४ तळ उद्‌ध्वस्त केले असून त्यात हवाई दलाच्या ११ तळांचा समावेश असल्याचा दावा रशियाने केला आहे. तर रशियाची ६ लढाऊ विमाने व एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाचे सैन्य कीवपर्यंत पोहोचले. तसेच रशियाचे काही रणगाडेही उद्ध्वस्त केल्याचे युक्रेनने म्हटले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे.

युक्रेनमधील नागरिकांचे फोटो, व्हिडीओ पाहून जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या कुटुंबाला नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या सुरक्षित ठिकाणी पाठवल्यानंतर लेकीच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहे. नागरिकांना आसरा घेण्यासाठी काही सुरक्षित ठिकाणं तयार करण्यात आली आहेत. कुटुंबाला तिथे सोडल्यानंतर रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी या पित्याला मागे थांबायचं असल्याने त्याला अश्रू अनावर झाले होते.

Web Title: Russia Ukraine War: Mom, I'm in the bunker, the front is exploding; Don't be afraid, Indian Daughter Called her Mother over Ukraine Situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.