Russia-Ukraine War: नेपाळचे पंतप्रधान PM मोदींवर खुश! 'या' मोठ्या मदतीसाठी मानले भारताचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 07:49 PM2022-03-12T19:49:37+5:302022-03-12T19:50:05+5:30
युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 18,000 भारतीयांना गेल्या 8 मार्चपर्यंत परत मायदेशात आणण्यात आले आहे...
काठमांडू - नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा (Sher Bahadur Deuba) यांनी, युक्रेनमधून 4 नेपाळी नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत.
ट्विट करून मानले आभार -
पंतप्रधान देउबा ट्विटर करत म्हणाले, नेपाळचे 4 नागरिक नुकतेच युक्रेनवरून भारत मार्गे नेपाळमध्ये पोहोचले आहेत. ऑपरेशन गंगाच्या माध्यमाने नेपाळच्या या नागरिकांना परत आणण्यात सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे आभार.
Four Nepali nationals have just arrived in Nepal from Ukraine via India.
— Sher Bahadur Deuba (@SherBDeuba) March 12, 2022
Thank you Prime Minister @narendramodi and the Government of India for the assistance in repatriating Nepali nationals through the #OperationGanga.
नेपाळच्या नागरिकांची मदत -
खरे तर, भारताने आतापर्यंत 6 नेपाळी नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढले आहे. नेपाळने आपल्या अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडे मदत मागितली होती. युक्रेनला लागून असलेल्या देशांतून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने 22 फेब्रुवारी पासून ऑपरेशन गंगा सुरू केले आहे.
आतापर्यंत हजारो भारतीयांना आणण्यात आले परत -
युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 18,000 भारतीयांना गेल्या 8 मार्चपर्यंत परत मायदेशात आणण्यात आले आहे. 75 विशेष नागरी उड्डाणांद्वारे एअरलिफ्ट केलेल्या भारतीयांची संख्या 15,521 वर गेली आहे. ऑपरेशन गंगाचा एक भाग म्हणून, भारतीय वायुसेनेनेही 2,467 प्रवाशांना परत आणण्यासाठी 12 मिशन उड्डाणे केली. एवढेच नाही तर, या विमानांतून 32 टनहून अधिक मदत साहित्यही नेण्यात आले होते.