Russia-Ukraine War: आगीत तेल! युद्ध संपवण्याच्या विचारात होते पुतीन; युक्रेननं रशियाच्या 'या' बड्या नेत्यावर डागली तोफ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 09:57 AM2022-12-23T09:57:33+5:302022-12-23T09:58:14+5:30

"हा हल्ला कदाचित फ्रान्समध्ये तयार झालेल्या हॉवित्झर ने केला असण्याची शक्यत आहे."

Russia-Ukraine War Oil in the fire Putin wanted to end the war There Ukraine fired a cannon at the great leader of Russia in donetsk | Russia-Ukraine War: आगीत तेल! युद्ध संपवण्याच्या विचारात होते पुतीन; युक्रेननं रशियाच्या 'या' बड्या नेत्यावर डागली तोफ!

Russia-Ukraine War: आगीत तेल! युद्ध संपवण्याच्या विचारात होते पुतीन; युक्रेननं रशियाच्या 'या' बड्या नेत्यावर डागली तोफ!

googlenewsNext

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 300 दिवस होऊन गेले आहेत. पण कोणताही देश झुकायला तयार नाही. दोन्ही देशांत भयंकर युद्ध सुरू आहे. दरम्यान, युक्रेनच्या हल्ल्यात रशियाचे माजी उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन जखमी झाले आहेत. पूर्व युक्रेनमध्ये रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागातील एका हॉटेलवर हल्ला झाला होता. यात दिमित्री यांच्या खांद्याजवळ दुखापत झाली आहे. दिमित्री रोगोझिन हे रशियन स्पेस एजन्सी Roscosmos चे प्रमुख देखील राहिले आहेत.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, डोनेत्स्क शहराच्या बाहेरील भागात झालेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रशियाच्या प्रॉक्सी डोनेस्तक पीपल्स रिपब्लिकचे प्रमुख विटाली खोतसेन्को हे देखील या हल्ल्यात जखमी झाल्याचे समजते. रोगोझिन हे नेहमीच पाश्चात्य देशांविरोधात वक्तव्य करत असतात. याच बरोबर ते युक्रेनवरील रशियच्या आक्रमणाचे समर्थकदेखील आहेत.

हॉवित्झरने साधला निशाणा? -
दिमित्री रोगोझिन हे शीश-बेश हॉटेलमध्ये होते. त्यांनी गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, ही वॉलंटियर युनिटमधून परतल्यानंतर सहकाऱ्यांच्या क्लोज सर्कल सोबदची एक व्यापारी बैठक होती. आम्ही एवढे महिने या हॉटेलमध्ये राहिलो आहोत, गेल्या आठ वर्षांत येथे शत्रूने कधीही गोळीबार केला नाही. याशिवाय, एका सहकाऱ्याने रशियन माध्यमाशी बोलताना सांगितले, होटलवर गाइडेड हल्ला करण्यात आला. हा हल्ला कदाचित फ्रान्समध्ये तयार झालेल्या हॉवित्झर ने केला असण्याची शक्यत आहे.

आमचे लक्ष्य युद्ध संपवणे आहे - पुतीन 
अमेरिका दौऱ्यादरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या विधानानंतर, पत्रकारांसोबत बोलताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन म्हणाले होते, आमचे लक्ष्य लष्करी संघर्ष वाढविणे नसून युद्ध संपवणे आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि यापुढेही प्रयत्नशील राहू. रशियाला युक्रेनसोबतचे युद्ध संपवायचे आहे. युद्ध हे कुटनीतीक चर्चेनंतरच संपतात.
 

Web Title: Russia-Ukraine War Oil in the fire Putin wanted to end the war There Ukraine fired a cannon at the great leader of Russia in donetsk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.