Russia-Ukraine War: भारताची पाकिस्तानी तरुणीला मदत, व्हिडिओ शेअर करुन नरेंद्र मोदींचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 10:06 AM2022-03-09T10:06:44+5:302022-03-09T10:10:53+5:30

युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पाकिस्तानी मुलीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी मदत केली. यानंतर तिने भारतीय दूतावास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

Russia-Ukraine War| Pakistan's Asma Shafique thanks the Indian embassy in Kyiv and Prime Minister Modi for evacuating her from Ukraine | Russia-Ukraine War: भारताची पाकिस्तानी तरुणीला मदत, व्हिडिओ शेअर करुन नरेंद्र मोदींचे मानले आभार

Russia-Ukraine War: भारताची पाकिस्तानी तरुणीला मदत, व्हिडिओ शेअर करुन नरेंद्र मोदींचे मानले आभार

Next

कीव: पाकिस्तान भारताविषयी नेहमी द्वेष पसरवतो, पण भारत कठीण काळात मदत करण्यास मागेपुढे पाहत नाही. असेच काहीसे युक्रेनमध्ये पाहायला मिळाले. कीवमधील भारतीय दूतावासाने एका पाकिस्तानी मुलीला वाचवण्यासाठी मदत केली. खुद्द पाकिस्तानी तरुणीने व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

व्हिडिओमध्ये ती मुलगी 'माझे नाव अस्मा शफीक आहे आणि मी पाकिस्तानची आहे' असे म्हणताना दिसत आहे. मी कीवमधील भारतीय दूतावास आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो, त्यांनी मला कीवमधून बाहेर पडण्यास मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी अस्माला युद्धग्रस्त भागातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची आणि पश्चिम युक्रेनला पाठवण्याची व्यवस्था केली आहे.

भारतीय विद्यार्थ्यांनीही मदत केली
युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकार ऑपरेशन गंगा मोहीम राबवत आहे. या अंतर्गत आतापर्यंत मोठ्या संख्येने लोकांना सुखरूप परत आणण्यात आले आहे. यापूर्वी भारतीय विद्यार्थी अंकित यादव यानेही एका पाकिस्तानी मुलीला मदत केली होती. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियन हल्ल्यात युक्रेनमध्ये अडकलेल्या अंकितने केवळ स्वत:ला वाचवले नाही तर कीवमध्ये शिकणाऱ्या एका पाकिस्तानी मुलीला रोमानियाच्या सीमेवर पोहोचण्यास मदत केली. तेथून त्याला पाकिस्तानात नेण्यात आले.

Web Title: Russia-Ukraine War| Pakistan's Asma Shafique thanks the Indian embassy in Kyiv and Prime Minister Modi for evacuating her from Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.