शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Russia Ukraine War: हातावर लिहिलेल्या फोन नंबरनं केली कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 5:47 AM

Russia Ukraine War: युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या मुलाचं काही बरंवाईट होऊ नये म्हणून जपोरिजिया येथे राहणाऱ्या युलिया पिसेसकाया या महिलेनं छातीवर दगड ठेवून आपल्या ११ वर्षांच्या हसन अल-खलाफ या मुलाला एक हजार किलोमीटर दूर अंतरावरील स्लोवाकिया या देशात एकट्यानं पाठवलं.

रशियानं युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेनमधील अक्षरश: लक्षावधी लोक बेघर झाले. जिथे कुठे त्यांना सुरक्षित वाटेल, अशा ठिकाणी त्यांनी पलायन केलं. अधिकृत आकडेवारीनुसार युक्रेनमधून आतापर्यंत किमान एक कोटीपेक्षा जास्त लोकांना आपलं घरदार सोडून जीव वाचविण्यासाठी पळावं लागलं आहे. संपूर्ण देशाच्या जवळपास २५ टक्के लोक या युद्धामुळे बेघर झाले आहेत. त्यातील ६५ लाख लोकांनी देशातच अन्य कुठे स्थलांतर केलं आहे, तर तब्बल ४० लाख लोकांनी आपला देशच सोडला आहे.

अशा या वातावरणात एक हृदयद्रावक कहाणी सध्या सगळीकडे चर्चेत आहे. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या मुलाचं काही बरंवाईट होऊ नये म्हणून जपोरिजिया येथे राहणाऱ्या युलिया पिसेसकाया या महिलेनं छातीवर दगड ठेवून आपल्या ११ वर्षांच्या हसन अल-खलाफ या मुलाला एक हजार किलोमीटर दूर अंतरावरील स्लोवाकिया या देशात एकट्यानं पाठवलं. कारण तेच आता त्याचं ‘घर’ असणार होतं! या मुलाला जेव्हा तिनं ट्रेनमध्ये बसवलं तेव्हा त्याच्याकडे होती फक्त एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी, पासपोर्ट आणि हातावर पेननं लिहिलेला तेथील नातेवाइकांचा फोन नंबर! 

तिनं या अपेक्षेनं आपल्या मुलाला एकट्यानं ट्रेनमध्ये बसवलं की जगात खूप चांगली माणसं आहेत, ती आपल्या मुलालाही मदत करतील आणि आपला मुलगा सुखरूपपणे नातेवाइकांकडे पोहोचेल. आश्चर्य म्हणजे घडलंही तसंच. युलिया विधवा आहे. युद्धाचे वारे वाहू लागल्याबरोबर आधी तिनं आपल्या मुलाला आणि मुलीला इतर नातेवाइकांसोबत स्लोवाकियाला पाठवून दिलं. हसन लहान असल्यामुळे त्यावेळी तिनं त्याला आपल्यासोबतच ठेवलं. पण जेव्हा स्वत:च्या शहरावरच बॉम्ब पडला, तेव्हा ही माता आपल्या मुलाच्या काळजीनं चिंतेत पडली आणि तिनं त्याला एकट्यानं स्लोवाकियात आपल्या भावंडांकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. ती स्वत: त्यावेळी हसनसोबत जाऊ शकत नव्हती, कारण तिची म्हातारी आई अतिशय आजारी होती. तिच्या स्वत:कडेही फोन वगैरे नव्हता, त्यामुळे संपर्कासाठी मुलालाही ती काही देऊ शकत नव्हती. शेवटी तिनं मुलाच्या हातावरच नातेवाइकांचा फोन नंबर कोरून लिहिला आणि धडधडत्या अंत:करणानं अनोळखी लोकांच्या भरवशावर स्लोवाकियाकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये त्याला बसवून दिलं.

एकट्यानं थेट दुसऱ्या देशात जायचं म्हणून हसनही खूप घाबरलेला होता. यापूर्वी कधीही, कुठेही त्यानं एकट्यानं प्रवास केलेला नव्हता; पण त्यानंही हिंमत केली, आजीला घेऊन तू पण लवकर आमच्याकडे परत ये, असं पाणावल्या डोळ्यांनी आईला सांगत त्यानं तिचा निरोप घेतला. मोठ्या अडचणींतून तो स्लोवाकियाच्या बॉर्डरवर पोहोचला. अपेक्षेप्रमाणे स्लोवाकियाच्या अधिकाऱ्यांनी हसनला अडवलं. कोण, कुठला, एकटा कसा काय आला, याची चौकशी केली. हसन निष्पाप असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी हसनच्या हातावर लिहिलेल्या क्रमांकावर त्याच्या नातेवाइकांना फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या ताब्यात दिलं. हसनला एकटं पाठवण्यासाठी आईचं मन वळवण्यात स्लोवाकियात असलेल्या त्याच्या भावंडांनीही पुढाकार घेतला होता; पण तेही अतिशय घाबरलेले होते. हसनची भेट झाल्यावर या भावंडांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

मुलांची एकमेकांशी भेट झाल्यानंतर युलियानं फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात तिनं म्हटलं होतं, माझी आई ८५ वर्षांची आहे. ती आजारी आहे. अशा परिस्थितीत मी तिला एकटीला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. माझा मुलगा हसन अजून लहान आहे. त्याला पुढे अजून खूप आयुष्य आहे, जगायचं आहे. त्यामुळेच मी एकट्यानं त्याला स्लोवाकियाला पाठवण्याचा निर्णय घेतला; केवळ याच भरवशावर, की अजून जगात चांगली माणसं खूप आहेत. माझी अपेक्षा खरी ठरली. ज्यांनी ज्यांनी माझ्या मुलाला मदत केली त्यांचे, स्लोवाकियाचे बॉर्डर गार्डस्, स्वयंसेवक या साऱ्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत...

हसनला ज्या ट्रेनमध्ये बसवलं होतं, ती ट्रेन खच्चून भरलेली होती. एकेका डब्यात जवळपास तीनशेच्या वर माणसं कोंबलेली होती. स्लोवाकियात पोहोचल्यावरही अनोळखी माणसं, अनोळखी भाषा, अनोळखी देश.. यामुळे तो भांबावला होता; पण घाबरला नाही. युक्रेनियन शौर्याचं प्रतीक म्हणून आज हसनकडे बघितलं जात आहे. संपूर्ण कुटुंबाची झाली गळाभेटआपली आई आणि आजी अजून युक्रेनमध्येच आहे. त्यांच्या जिवाला फार मोठा धोका आहे. त्यामुळे त्यांनीही स्लोवाकियाला आपल्याकडे निघून यावं, किमान तसा प्रयत्न तरी करावा, असं युलियाच्या मुलांना खूप वाटत होतं. त्यांनी तिला बरीच गळ घातली. शेवटी आजारी आईला घेऊन तिनंही युक्रेनची सीमा कशीबशी पार केली. आता अख्खं कुटुंब सोबत आहे, याचा त्यांना फार आनंद आहे. संपूर्ण आयुष्य त्यांना आता नव्यानं सुरू करावं लागणार आहे; पण त्याची आता त्यांना चिंता नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध