Russia Ukraine War: पुतिन यांनी आपले कुटुंब अंडरग्राउंड शहरात पाठवले! रशियन प्रोफेसरनं केले धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 09:18 AM2022-03-02T09:18:05+5:302022-03-02T09:18:30+5:30

"राष्ट्रपती पुतिन यांना अणुयुद्ध होण्याची शक्यता वाटते. यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेतला आहे."

Russia Ukraine War: Putin sent his family to the underground city! Shocking revelations made by a Russian professor | Russia Ukraine War: पुतिन यांनी आपले कुटुंब अंडरग्राउंड शहरात पाठवले! रशियन प्रोफेसरनं केले धक्कादायक खुलासे

Russia Ukraine War: पुतिन यांनी आपले कुटुंब अंडरग्राउंड शहरात पाठवले! रशियन प्रोफेसरनं केले धक्कादायक खुलासे

googlenewsNext

मॉस्‍को - रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) तर चर्चेत होतेच. पण आता त्यांचे कुटुंबही चर्चेत आले आहे. पुतिन यांनी आपले संपूर्ण कुटुंब एका अशा अंडरग्राउंड शहरात पाठवले आहे, ज्यावर अण्वस्त्र हल्ल्यांचाही काहीच परिणाम होणार नाही. पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सायबेरियातील एका गुप्त ठिकाणी पाठवले आहे. असा दावा एका रशियन प्राध्यापकाने केला आहे. एवढेच नाही, तर राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासंदर्भात त्यांनी आणखीही बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.

यासंदर्भात डेली मेलने आपल्या वृत्तात मॉस्को स्टेस इंस्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे माजी प्रोफेसर व्हॅलेरी सोलोव्ही यांच्या वक्तव्याचा हवाला दिला आहे. वृत्तानुसार, राष्ट्रपती पुतिन यांना अणुयुद्ध होण्याची शक्यता वाटते. यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रोफेसर व्हॅलेरी सोलोव्ही यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. असे सांगण्यात आले आहे की, प्रोफेसर सोलोव्ही यांचा पुतिन प्रशासनातील अनेक सीक्रेट अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद असतो. तसेच त्यांना बरीच गुप्त माहितीही असते. एवढेच नाही तर, अंडरग्राउंड शहर सायबेरियाच्या अल्‍ताई पर्वतात आहे. मात्र, वृत्तात याची पुष्टी करण्यात आलेली नाही.

हायटेक बंकरमध्ये पूर्णपणे सुरक्षित -
प्रोफेसर सोलोव्ही यांनी म्हटल्या प्रमाणे, पुतिन यांनी आपल्या कुटुंबीयांना आधीपासूनच तयार असलेल्या हायटेक बंकरमध्ये पाठवले आहे. हे बंकर सायबेरियाच्या अल्ताई पर्वतात आहे. येथे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. अणुयुद्धाच्या परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने हे बंकर डिझाईन करण्यात आले आहे.

Web Title: Russia Ukraine War: Putin sent his family to the underground city! Shocking revelations made by a Russian professor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.