कीव – रशिया-यूक्रेन युद्धाचा आज १० वा दिवस आहे. यूक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त केल्यानंतरही रशियाचा आक्रमक हल्ला थांबण्याची चिन्हं नाहीत. अणुहल्ल्याच्या दहशतीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी यूक्रेनचं समर्थन करणाऱ्या पाश्चात्य देशांना मोठा इशारा दिला आहे. रशियाने दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुक आणि ट्विटरला रशियात बंदी घातली आहे. त्याचसोबत रशियन सैन्याविरोधात फेक न्यूज चालवणाऱ्या विरुद्ध नवीन कायदा आणला आहे. त्याअंतर्गत १५ वर्षापर्यंत जेल होण्याची शक्यता आहे.
त्यातच रशियानं यूक्रेनच्या राष्ट्रपती भवनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. रशियानं राष्ट्रपती भवनाजवळ रॉकेट हल्ला केल्याचा दावा यूक्रेननं केला आहे. तर यूक्रेनचा हा दावा रशियानं फेटाळून लावला आहे. व्लादिमीर पुतिन(Valdimir Putin) यांनी जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्ज यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. त्यावेळी यूक्रेनच्या शहरांवर रशियानं बॉम्बहल्ले केल्याचा नकार दिला. यूक्रेनचा रशियाविरोधात प्रपोगेंडा पसरवला जात आहे. एएफपीनं ही बातमी दिली आहे.
Samsung नं मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक चिप्सचा पुरवठा रोखला
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सनं यूक्रेनच्या समर्थनात रशियाला होणारा मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स चिप्सचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. सॅमसंगनं म्हटलंय की, सध्याच्या जियोपॉलिटिकल मुद्द्यावरून रशियाला होणारा साहित्य पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही या कठीण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी केला नाटोच्या निर्णयाचा निषेध
यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्कीनं(Volodymyr Zelenskyy) यूक्रेनला नो फ्लाय झोनच्या बाहेर काढण्याचा NATO च्या निर्णयाचा निषेध केला आहे. आज संध्याकाळी झेलेंस्की अमेरिकन डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन सीनेटर यांच्यासोबत व्हर्चुअल बैठक घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ४ वाजता ही बैठक सुरू होईल. तर दुसरीकडे यूक्रेनचे माजी पंतप्रधान अजारोव यांनी म्हटलं की, राष्ट्रपती झेलेंस्की कीवच्या केंद्रस्थानी असलेल्या एका बंकरमध्ये लपलेले असू शकतात. हा बंकर इतका मजबूत आहे की अणुहल्ला जरी झाला तरी त्याचा परिणाम होणार नाही.