शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

मारियुपोलमध्ये रशियाकडून ९ हजार मृतदेहांची विल्हेवाट? संभाव्य दफनभूमींची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 8:31 AM

मारियुपोल शहर जिंकल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर, काही तासातच या सामुदायिक दफनभूमींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकविण्यात आली.

कीव्ह : रशियाने बेचिराख केलेल्या मारियुपोल शहरात युद्धामध्ये ठार झालेल्या नागरिकांच्या मृतदेहांचे सामुदायिक दफन केल्याचा आरोप झाला होता. या संभाव्य सामुदायिक दफनभूमींची उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकली आहेत. रशियाच्या सैनिकांनी मारियुपोलमधील नऊ हजार जणांच्या  मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मारियुपोल शहर जिंकल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर, काही तासातच या सामुदायिक दफनभूमींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकविण्यात आली. मारियुपोलमधील स्टील प्रकल्पाच्या आडोशाने अजूनही युक्रेनचे दोन हजार सैनिक रशियाशी झुंज देत असून, त्यामुळे खरे तर या शहरावर पुतीन यांना पूर्ण कब्जा मिळविता आलेला नाही; पण त्या शहरात विजयी झाल्याचा प्रचार रशियाने चालविला आहे. 

मारियुपोलमध्ये रशियाने २०० ठिकाणी सामुदायिक दफनभूमी तयार केल्या असून, तिथे मृतदेह पुरले जात असल्याचा आरोप होत आहे. या शहराबाहेर मनहुश भागात पूर्वी असलेल्या दफनभूमीपासून काही अंतरावरच सामुदायिक दफन केले जाते. त्या दफनभूमीची छायाचित्रेही उपग्रहाने टिपली आहेत.

ही तर नाझी कृत्ये --    मारियुपोल शहराचे महापौर वदिम बोयचेन्को यांनी म्हटले आहे की, रशियाचे सैनिक आपली युद्धगुन्हेगारी लपविण्यासाठी मृतदेह सामुदायिक दफनभूमींमध्ये पुरत आहेत. -    १९४१ मध्ये जर्मनीच्या नाझी सैन्याने युक्रेनमधील ३४ हजार ज्यूंना ठार मारले होते. -    बाबियार या ठिकाणी ही भयंकर कृत्ये घडली होती. रशियाचे सैनिक आता नवे बाबियार घडवीत आहेत, असा आरोप बोयचेन्को यांनी केला.

रशियाकडून अद्याप प्रतिक्रिया नाही --    मारियुपोल शहरात रशियाच्या सैनिकांनी उघडलेल्या सामुदायिक दफनभूमींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकल्यानंतरही पुतीन सरकारने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.-    बुका शहर व कीव्ह परिसरात अनेक मृतदेह सापडल्यानंतर, हे तर युक्रेनचेच कारस्थान आहे, असा कांगावा रशियाने केला होता; पण आता तशीही प्रतिक्रिया देणे रशियाने टाळले आहे.

रशियात लष्करी केंद्राच्या आगीत सहा जणांचा मृत्यू -- मॉस्को : रशियातील त्वेर शहरामध्ये लष्करी संशोधन केंद्राला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहेत. इमारतीला आग लागल्यानंतर काही लोकांनी जीव वाचविण्यासाठी खिडकीतून खाली उडी मारली. या प्रयत्नात काही जण जखमी झाले.

- या लष्करी संशोधन केंद्राच्या प्रशासकीय विभागात प्रथम आग लागली. त्यानंतर या आगीने संपूर्ण इमारतीलाच घेरले. त्यामुळे तेथील लोकांनी जीव वाचविण्यासाठी खि़डकीतून खाली उड्या मारल्या. त्यात काहींचा जीव गेला, तर काही जण जखमी झाले.

- या संशोधन केंद्रातील जुन्या वायरींमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, असे म्हटले जात आहे. मात्र त्याला रशिया सरकारने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 

- हवाई सुरक्षेबाबत या लष्करी केंद्रामध्ये संशोधन चालते. लढाऊ विमानरोधक प्रणाली अधिक अद्ययावत करण्याचेही काम या केंद्रात चालते. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या केंद्राला आग लागल्याने रशियाच्या लष्कराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

- या आगीत सापडलेल्यांपैकी आणखी १० जण अद्याप बेपत्ता आहेत, असे एका वृत्तात म्हटले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी बरेच तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धDeathमृत्यू