Russia Ukraine War: सुमीतून पुतिनसेना माघारी! कैद सैनिकांना सोडायच्या बदल्यात युक्रेननं खाली करून घेतला संपूर्ण प्रदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:32 PM2022-03-02T15:32:21+5:302022-03-02T15:34:42+5:30

या रशियन सैनिकांनी 1 मार्चला माघार घेतली. याची माहिती Dmytro Zhyvytskyi यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत दिली.

Russia Ukraine war Russia Ukraine crisis Russian troops leaving and returning from sumy region | Russia Ukraine War: सुमीतून पुतिनसेना माघारी! कैद सैनिकांना सोडायच्या बदल्यात युक्रेननं खाली करून घेतला संपूर्ण प्रदेश

Russia Ukraine War: सुमीतून पुतिनसेना माघारी! कैद सैनिकांना सोडायच्या बदल्यात युक्रेननं खाली करून घेतला संपूर्ण प्रदेश

googlenewsNext

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच युक्रेनकडून मोठा दावा करण्यात येत आहे. सुमी भागातून आता रशियन सैन्य माघारी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही, तर हे सैन्य आता रशिला परतत असल्याचेही बोलले जात आहे. दावा करण्यात येत आहे की, दोन्ही बाजूंच्या दीर्घ चर्चेनंतर, असे होत आहे. मात्र, याचा अर्थ संपूर्ण युक्रेनमधूनच रशियन सैन्य माघारी फिरेल, असा नाही. हा करार केवळ एका युनिटपुरताच मर्यादित आहे.

Ukrinform च्या वृत्तानुसार, सुमी प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख Dmytro Zhyvytskyi यांनी ही माहिती दिली. Dmytro Zhyvytskyi म्हणाले, रशियाचेसैनिक आपली शस्त्रे आणि सामानासह माघारी परतत आहेत. या दोन्ही गटात दीर्घ चर्चा झाल्यानंतर हा निर्मय झाला आहे.

या रशियन सैनिकांनी 1 मार्चला माघार घेतली. याची माहिती Dmytro Zhyvytskyi यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत दिली. या करारात, शस्त्रे, टँक आणि इतर उपकरणे रशियाला परत नेण्यासंदर्भातही बोलणे झाले आहे.

'रशियाला परतल्यानंतर जेलमध्ये जावे लागेल, पण आता युद्ध लढणार नाही' -
Zhyvytskyi यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आता आपण हे युद्ध लढणार नाही. मला रशियात गेल्यानंतर जेलमध्ये जावे लागेल, पण आता मी टँकचे तोंड घराकडे वळविण्याचे ठरवले आहे," असे संबंधित रशियन युनिटच्या प्रमुखाने म्हटले आहे. मात्र, असे असले तरी, रशियन सैनिकांची ही तुकडी खरोखरच परत जात आहे, की नाही यावरही लक्ष ठेवले जात असल्याचेही  Dmytro Zhyvytskyi यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: Russia Ukraine war Russia Ukraine crisis Russian troops leaving and returning from sumy region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.