रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 06:19 PM2024-06-14T18:19:43+5:302024-06-14T18:21:05+5:30

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात सुरू असलेले युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे.

Russia Ukraine War : Russia-Ukraine war will stop; Putin said - 'We are ready for a ceasefire, but' | रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'

Russia Ukraine War : मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) युद्ध थांबवण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनसोबत युद्धविराम (cease-fire) करण्याची तयारी दर्शवली आहे. पण, यासाठी त्यांनी एक अटही ठेवली आहे. त्यांची अट युक्रेनने मान्य केली, तर हे युद्ध थांबू शकते.

वृत्तसंस्था पीटीआयने एपी हवाल्याने सांगितले की, रशियाने युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे, पण यासाठी युक्रेनला आपले सैन्य मागे घ्यावे लागेल आणि NATO मध्ये सामील होण्याची योजनादेखील थांबवावी लागेल. इटलीमध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

पुतिन यांनी कोणत्या मागण्या केल्या ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतिन यांनी दोन्ही देशांमधील शांततेसाठी इतर अनेक मागण्या केल्या आहेत, ज्यात युक्रेनकडील अण्वस्त्र, त्यांच्या लष्करी दलांवर निर्बंध आणि रशियन भाषिक लोकांच्या हिताचे रक्षण करणे सामील आहे. पुतीन म्हणाले की, या सर्व मूलभूत मागण्या आंतरराष्ट्रीय करारांचा भाग बनल्या पाहिजेत आणि रशियावरील सर्व पाश्चात्य देशांचे निर्बंध उठवले गेले पाहिजेत, तरच युद्धविराम होऊ शकेल.

Web Title: Russia Ukraine War : Russia-Ukraine war will stop; Putin said - 'We are ready for a ceasefire, but'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.