रशियाला गेले महिनाभर आव्हाने देणाऱ्या अमेरिकेने हल्ल्या झाल्यानंतर युक्रेनच्या मदतीला जाण्यास नकार दिला होता. यामुळे अमेरिकेची पुरती नाचक्की झाली होती. रशियाने कोणी मध्ये आल्यास इतिहास बदलून ठेवण्याचा इशारा दिला होता. अमेरिकेने युक्रेनला युद्धासाठी मोठी मदत केली आहे. फ्रान्सकडून शस्त्रास्त्रांचा साठा युक्रेनच्या दिशेने रवाना झाला आहे. अशातच युक्रेनला रशियासोबत लढण्यासाठी आणखी शस्त्रास्त्रांची तसेच दारुगोळ्याची गरज भासणार आहे. त्यातच युक्रेनचे प्रचंड नुकसान रशियाने केले आहे. यामुळे ही शस्त्रे विकत घेण्यासाठी युक्रेनला अमेरिकेने 350 दशलक्ष डॉलर्सची मदत देऊ केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद आता चिघळला आहे. रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे.
कीवमधील इमारतीवरही क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनच्या गृह मंत्रालयाने सोशल मीडियावर अमेरिकेचा 9/11 हल्ला आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनवरील हल्ल्यांची तुलना करणारे फोटो शेअर केले आहेत. फोटोत अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (World Trade Centre) ट्विन टॉवर्सवर 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर निघलेला धूर दिसत आहे. तसंच फोटोत कीवमधील रशियन हल्ल्यादरम्यान, क्षेपणास्त्राचा हल्ला (Missile Attack) झाल्यानंतर एक कोसळताना इमारत दिसत आहे. युक्रेनने कीवमधील (Kyiv) इमारतीवरील रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याची तुलना अमेरिकेच्या 9/11 शी केली आहे.
युक्रेनने जगातील सर्व देशांना रशियाच्या राजदूतांना त्यांच्या देशातून काढून टाकण्यास सांगितलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशिया युक्रेनमध्ये हल्ले करत असून आगामी काळात क्षेपणास्त्र हल्ल्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. युक्रेनमधील सामान्य लोकही रशियन हल्ल्याचे बळी ठरले आहेत. याशिवाय रशिया युक्रेनचे अनेक लष्करी तळ नष्ट करण्याचा दावा करत आहे. युक्रेनमध्ये आता सामान्य नागरिकही युद्धासाठी तयार झाले आहेत. युक्रेनच्या रस्त्यांवर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यांना शस्त्रे पुरविली जात आहेत. अशातच त्यांना आणखी शस्त्रे, बंदुकांची गरज लागणार आहे. यापूर्वी अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविली आहेत त्यात ही वाढीव मदत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने जाहीर केली आहे.
युद्ध पेटलं! मिसाईल हल्ला, स्फोटांचे आवाज, भीषण परिस्थितीत जोडप्याने केलं लग्न; भावूक करणारं कारण
युद्ध पेटलेलं असतानाच युक्रेनमधील एका जोडप्याने चक्क लग्न केल्याची घटना समोर आली आहे. भीषण परिस्थिती, स्फोटांचे आवाज, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ असं सगळं सुरू असताना एका जोडप्याने लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामागचं नेमकं कारण ऐकून तुम्ही देखील भावूक व्हाल. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार 21 वर्षीय यारयाना अरिएवा (Yaryna Arieva) आणि तिचा पार्टनर 24 वर्षीय प्रियकर स्वियाटोस्लाव फर्सिन (Sviatoslav Fursin ) यांनी कीवमधील सेंट मायकल मॉनेस्ट्रीमध्ये लग्न केलं. खरं तर त्यांना सहा मे रोजी लग्न करायचं होतं. डनिपर नदीवर उभारलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये ते हा सोहळा अत्यंत आनंदात साजरा करणार होते. देशामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे सर्व काही अचानक बदललं. "आम्ही जिवंत राहू की नाही काय माहिती? आमचं भविष्य काय असेल? याबाबत कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आम्ही लगेचच लग्न करण्याचा निर्णय घेतला" अशी प्रतिक्रिया जोडप्याने आपल्या लग्नावर दिली.