शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

Russia Ukraine War: युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाचंही मोठं नुकसान; आतापर्यंत २९ एअरक्राफ्ट आणि १९१ टँक उद्ध्वस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:29 IST

Russia Ukraine War: रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत 5,300 युक्रेनियन लोकांना ठार केले आहे. मात्र, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने मोठ्या प्रमाणावर विनाश केला आहे. रशियानं या युद्धात आपलं किती नुकसान झालंय याची माहिती दिली आहे. रशियाचे उप संरक्षण मंत्री हन्ना मलियार यांनी सोमवारी फेसबुकवर सांगितलं की, "रशियन सैन्याने युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या चार दिवसांच्या लढाईत एकूण 29 विमानं, 29 हेलिकॉप्टर आणि तीन अनमॅन्ड एरियल व्हीकल गमावली आहेत. तसंच पाच हवाई संरक्षण प्रणालीचंही नुकसान झालं आहे". तसंच रशियानं आतापर्य़ंत युक्रेनचे १९१ रणगाडे, ८१६ लढाऊ वाहनं, २९१ वाहनं आणि दोन जहाजं पाडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

लष्कराने 74 तोफा, एक बक विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आणि 21 ग्रॅड मल्टिपल रॉकेट लॉन्चर गमावल्याची माहिती, रशियाच्या उप संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. तसंच युक्रेनच्या 5300 जणांना आतापर्यंत ठार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महत्वाची बाब अशी की हा आकडा आणखी वाढू शकतो. कारण युद्धाच्या परिस्थितीत अचूक माहिती मिळवणं फार कठीण होऊन बसतं. 

युक्रेनच्या नुकसानाचीही माहिती रशियानं दिलीयुक्रेन विरुद्धच्या युद्धात आपले अनेक सैनिक मारले गेल्याचं रशियाकडून रविवारी मान्य करण्यात आलं होतं. "आमचे काही सैनिक शहीद झाले आहेत. तर काही जखमी झाले आहेत", असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव यांनी सांगितलं. पण त्यांनी नेमका आकडा यावेळी जाहीर केला नाही. युक्रेनच्या तुलनेत रशियाचं नुकसान खूप कमी झाल्याचा दावा मात्र त्यांनी केला आहे. यु्क्रेनच्या एकूण १०६७ लष्करी तळांना आतापर्यंत लक्ष्य करण्यात आलं आहे. यात १७ कमांडिग पोस्ट आणि संपर्क केंद्रांचा समावेश आहे. तसंच ३८ डिफेंन्स मिसाइल सिस्टम आणि ५६ रडार प्रणालीही उद्ध्वस्त झाल्या आहेत. 

युद्धात युक्रेनच्या ३५२ सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यूयुक्रेनच्या गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार युद्धात आतापर्यंत देशातील १४ लहान मुलांसह एकूण ३५२ सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसंच ११६ लहान मुलांसह १६८४ लोक जखमी झाले आहेत. मंत्रालयानं रविवारी याबाबतची माहिती जाहीर केली. पण यात युक्रेनच्या लष्करातील किती जवानांचा मृत्यू झाला याची माहिती दिलेली नाही. दरम्यान, युक्रेनच्या केवळ लष्करी तळांवर हल्ला करण्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांना कोणताही धोका नाही असा दावा रशियाकडून केला जात आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धrussiaरशिया