Russia Ukraine Conflict:रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यापासून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रशियासमोर युक्रेनचा निभाव लागेल, अशी अपेक्षाही कुणी केली नव्हती. पण, रशियापेक्षा लहान असलेला युक्रेन रशियाला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो रशियन सैनिकांसोबत 8 जनरल आणि 34 कर्नल मारले गेले आहेत. तरीदेखील ना रशिया मागे हटतोय, ना युक्रेन हार मानायला तयार होतोय.
युक्रेनच्या हल्ल्यात जनरलचा मृत्यूमिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी युक्रेनच्या हल्ल्यात रशियन सैन्याच्या 8व्या जनरलचा मृत्यू झाला. या जनरलचा मृतदेह सेंट पीटर्सबर्गमध्ये दफन करण्यात आला. मेजर जनरल व्लादिमीर फ्रोलोव्ह असे ठार झालेल्या जनरलचे नाव आहे. ते 12व्या लष्कराचे उपकमांडर होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या मारियुपोल बंदरावर ताबा मिळवला होता. पण, शनिवारी युक्रेनने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
हजारो सैनिकही मरण पावलेया युद्धात रशियाचे झालेले नुकसान लष्करी दृष्टिकोनातून पाहिले तर ते अपेक्षेपेक्षा जास्त आहे. युक्रेनचा दावा आहे की, या युद्धाच्या सुरुवातीपासून त्यांनी रशियन सैन्याच्या 20,000 हून अधिक सैनिकांना ठार केले आहे. रशियाने मात्र याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. युक्रेनच्या दाव्यानुसार, त्यांनी रशियन सैन्यातील किमान 8 जनरल आणि 34 कर्नल दर्जाचे अधिकारी मारले आहेत.