रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाला (Russia-Ukraine War) आता एक महिना झाला आहे. जसजसं युद्ध पुढे जात आहे रशियन सैनिकांचं (Russian Soldier) मानसिक स्थैर्य ढासळत आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत परत जायचं आहे. बातमी तर अशीही समोर येत आहे की, नाराज सैनिकांनी आपल्याच एका सीनिअर ऑफिसरवर राग व्यक्ती केला. एका मीडिया रिपोर्टनुसार, रशियन कर्नलला त्यांच्याच सैनिकांनी टॅंकखाली चिरडून मारलं. हे कर्नल यूक्रेन युद्धात रशियन सैनिकांच्या एका युनिटचं नेतृत्व करत होते.
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, पश्चिम अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विद्रोही सैनिकांनी आपल्या कमांडरवर ३७व्या मोटर रायफल ब्रिगेड यूरी मेदवेदेव (Yuri Medvedev) वर जाणूनबुजून टॅंक चालवला. या आठवड्याच्या सुरूवातीला समोर आलेल्या फोटोंमध्ये कर्नल मेदवेदेव यांना स्ट्रेचरवर हॉस्पिटलमध्ये नेताना दाखवण्यात आलं होतं. कमांडर यूरी कीवमध्ये मकरिवमध्ये जखमी झाले होते.
आता सैनिकांना नकोय युद्ध
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, कमांडरच्या पायावरून टॅंक गेला होता. मात्र, तो वाचला. आता पश्चिमी देशांच्या अधिकाऱ्यांचं मत आहे की, गंभीर जखमांमुळे कमांडरचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितलं की, ब्रिगेड कमांडर आपल्याच सैनिकांच्या हातून मारले गेले. रशियन सैनिकांना आता युद्ध लढायचं नाहीये. त्यांना घरी परत जायचं आहे. अधिकारी पुढे म्हणाले की, युद्धात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ब्रिगेडचे सैनिक विद्रोह करत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी हे पाउल उचललं.
अधिकाऱ्यांनुसार, 'आम्हाला असं वाटतं की, कर्नलला त्यांच्याच सैनिकांनी मुद्दामहून मारलं. त्यांच्या सैनिकांनीच त्यांच्यावर टॅंक चढवला. यातून हे समोर येतं की, रशियन सेनेचं मनोबल ढासळलं आहे. आम्हाला तर अशी माहिती मिळाली की, अर्ध युनिट मारल्यानंतर सैनिकांनामध्ये विद्रोह दिसत आहे'.