Russia-Ukraine War: रशियाचा 'डोळा' फोडला; बेलारुसमध्ये घुसून ड्रोन हल्ला, आता तिसरा देश युद्धात उतरण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:59 PM2023-02-27T12:59:48+5:302023-02-27T13:00:24+5:30

बेलारूसची राजधानी मिंस्कमध्ये एका एअरबेसवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे.

Russia-Ukraine War: Russia's 'eye' a50 busted; Drone attack intrudes into Belarus, now third country likely to go to war with ukraine | Russia-Ukraine War: रशियाचा 'डोळा' फोडला; बेलारुसमध्ये घुसून ड्रोन हल्ला, आता तिसरा देश युद्धात उतरण्याची शक्यता

Russia-Ukraine War: रशियाचा 'डोळा' फोडला; बेलारुसमध्ये घुसून ड्रोन हल्ला, आता तिसरा देश युद्धात उतरण्याची शक्यता

googlenewsNext

मिंस्क: युक्रेन युद्धामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. रशियाचे हेरगिरी करणारे विमान बेलारूसमधील लष्कराच्या विमानतळावर उध्वस्त झाले आहे. यामुळे बेलारूसला युद्धात उडी घेण्याची आयती संधी मिळाली आहे. बेलारूस हा आपल्या देशात घुसून केलेला हल्ला असे समजू शकते आणि रशियाच्या बाजुने प्रत्यक्षपणे युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

बेलारूसची राजधानी मिंस्कमध्ये एका एअरबेसवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. हे विमान युक्रेन युद्धाची गोपनिय माहिती मिळवत होते. A-50 विमान नेस्तनाभूत झाल्याने रशियाच्या हवाईदलाला मोठा धक्का बसला आहे. 

बेलारुसचे हुकुमशहा लुकाशेंकोचे विरोधक अलेक्‍जेंडर अजरोव यांनी पोलंडच्या एका न्यूज चॅनलला सांगितले की, 'हल्ला करणारे ड्रोन होते. या मोहिमेवर बेलारुसचे लोक होते. ते आता सुरक्षित आहेत आणि देशाच्या बाहेर आहेत.' बेलारुसने BYPOL या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. अजरोव यांचीच ही संघटना आहे. बेलारुसचे सवितलाना यांचे स्वीय सल्लागार यांनी सांगितले की, विशेष मोहिमेला यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. 

2022 पासूनचा हा सर्वात यशस्वी बदल आहे, असे स्वितलाना यांनी म्हटले आहे. आतापर्यंत या घटनेला स्वतंत्रपणे दुजोरा मिळालेला नाही. या हल्ल्यात विमानाच्या पुढील आणि मधल्या भागाला मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे दोन स्फोट झाले आहेत. यामुळे रडारही नष्ट झाला आहे. बेरिव्ह A-50 विमान हे एकाचवेळी ६० लक्ष्यांवर लक्ष ठेवू शकणारे विमान होते. 

Web Title: Russia-Ukraine War: Russia's 'eye' a50 busted; Drone attack intrudes into Belarus, now third country likely to go to war with ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.