ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 05:39 PM2024-11-21T17:39:14+5:302024-11-21T17:40:07+5:30
Russia Ukraine War: रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनवर हल्ला करून जगाची झोप उडविली आहे. युक्रेनी हवाई दलानुसार रशियाने आयसीबीएम मिसाईलने हल्ला केला आहे.
रशियाने युक्रेनला बॅलेस्टिक मिसाईलचे शक्तीशाली ICBM मिसाईलने जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. हे मिसाईल आपल्यासोबत आणखी चार मिसाईल घेऊन जाते. एक मोठ्या ट्रकवर लादलेले हे मिसाईल युक्रेनवर डागले गेल्याने जगभरात खळबळ उडालेली आहे. जगात या मिसाईलचा पहिल्यांदाच वापर झाला आहे. यावरून रशियाच्या प्रवक्त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले जाणार होते. तितक्यात क्रेमलिनचा फोन आला आणि माईक सुरु असल्याने फजिती उडाली.
रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनवर हल्ला करून जगाची झोप उडविली आहे. युक्रेनी हवाई दलानुसार रशियाने आयसीबीएम मिसाईलने हल्ला केला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर इमारती आणि सरकारी संस्था नेस्तनाभूत झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया ज़खारोवा पत्रकारांशी बोलत होत्या. तितक्यात त्यांना क्रेमलिनकडून फोन आला, तो फोन त्यांनी उचलला आणि बोलायला लागल्या परंतू त्या माईक बंद करायचे विसरल्या. यामुळे पलीकडून त्यांना आयसीबीएम मिसाईलवर काही बोलू नका असे आदेश आले.
फोनवर होत असलेले बोलणे माईक चालूच असल्याने पत्रकारांसह सगळ्या जगाला ऐकू गेले. पुतीन यांनी युक्रेनकडून होत असलेल्या बॅलेस्टिक मिसाईल हल्ल्याला अण्वस्त्रांनी प्रत्यूत्तर देणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे रशिया युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करणार या शक्यतेने जगभरात खळबळ उडाली आहे. जाणकारांनुसार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी बॅलेस्टिक मिसाईल हल्ला करून लक्ष्मण रेखा पार केली आहे. यामुळे युरोपचे देश अण्वस्त्र युद्धाच्या भीतीने खाण्याच्या वस्तू आणि अन्य गोष्टी गोळा करू लागले आहेत. तर रशिया N-Resistant मोबाइल बंकर बनविण्याच्या तयारीला लागला आहे.